'चंदनशिवें'साठी क्रीडामंत्र्यांचा उपमुख्यमंत्री 'एकनाथ' शिंदेंना फोन !

(Edited By - अतिश गवळी, मुख्य संपादक - संघर्ष न्युज मराठी) मुंबई - राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपमूख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून सोलापूर शहरातील रोजंदारी बदली कामगारांचा विषय मांडला आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे हे बऱ्याच वर्षांपासून सोलापूर महानगरपालिकेतील बदली कामगारांच्या मागण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत. अशातच त्यांनी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगरविकास मंत्री खाते आहे. त्याच अंतर्गत महापालिकेच्या बदली कामगारांचा विषय येतो. आनंद चंदनशिवे हे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असल्याने त्यांनी लगेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून सदर विषय लवकर मार्गी लावावा अशी विनंती केली आहे. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे हे मागील काळात सोलापूरचे पालकमंत्री होते.याच काळात आनंद चंदनशिवे यांच्या...