दोन्ही देशमुखांना आमदार सचिन कल्याणशेट्टी जड ; मिळाला राज्यमंत्री पदाचा दर्जा!

मुंबई - आमदार निवास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा) सोलापूर भाजपा जिल्हाध्यक्ष अक्कलकोट आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांची निवड करण्यात आली आहे. अक्कलकोट विधासभेचे नेतृत्व करणारे सचिन दादा कल्याणशेट्टी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्र्वासातील अमादर म्हणून गणले जातात. व वरिष्ठ असलेले आमदार विजयकुमार देशमुख व आमदार सुभाष देशमूख यांना नवखे असलेली सचिन कल्याणशेट्टी हे जड जात असल्याचे यावेळी दिसून आले. सचिन दादा कल्याणशेट्टी यांना मंत्रिमंडळ दर्जा मिळाल्याने अक्कलकोट तालुक्यात आनंद व्यक्त केला जात आहे.