भाजप जिल्हा कार्याध्यक्ष 'इंद्रजीत पवार' यांच्या स्टेटसने जिंकली 'मराठा' समाजाची मने...

उत्तरमध्ये गावागावांत फटाके फोडून आनंद साजरा.... उत्तर सोलापूर तालुका - संघर्ष योद्धा मनोज पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला नवा अधिकार मिळाला आहे. सरकारच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे यांनी यशस्वी आंदोलन संपवले. आंदोलनाच्या यशानंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणाजी पंत म्हणून अनेक जण हिणवत असतानाच आपल्या चातुर्य बुद्धीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन हाताळले आहे.त्यांच्या शिस्तबद्धतेमुळेच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आल्याचे दिसून येत आहे. भाजप जिल्हा कार्याध्यक्ष इंद्रजीत पवार यांचे आंदोलन यशा नंतर त्यांचे व्हॉट्स ऍप स्टेट्स चर्चेत आहे. भाजप सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष इंद्रजीत पवार यांचे स्टेट्स असे की, "सगळेच अनाजी पंथ नसतेत काही तत्वाने बाजीप्रभू देशपांडे ही असतात..."