Posts

भाजप जिल्हा कार्याध्यक्ष 'इंद्रजीत पवार' यांच्या स्टेटसने जिंकली 'मराठा' समाजाची मने...

Image
उत्तरमध्ये गावागावांत फटाके फोडून आनंद साजरा.... उत्तर सोलापूर तालुका - संघर्ष योद्धा मनोज पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला नवा अधिकार मिळाला आहे. सरकारच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे यांनी यशस्वी आंदोलन संपवले. आंदोलनाच्या यशानंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणाजी पंत म्हणून अनेक जण हिणवत असतानाच आपल्या चातुर्य बुद्धीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन हाताळले आहे.त्यांच्या शिस्तबद्धतेमुळेच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आल्याचे दिसून येत आहे. भाजप जिल्हा कार्याध्यक्ष इंद्रजीत पवार यांचे आंदोलन यशा नंतर त्यांचे व्हॉट्स ऍप स्टेट्स चर्चेत आहे. भाजप सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष इंद्रजीत पवार यांचे स्टेट्स असे की, "सगळेच अनाजी पंथ नसतेत काही तत्वाने बाजीप्रभू देशपांडे ही असतात..."

हैदराबाद गॅझेट काय आहे बघा.....

Image
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी म्हणजे मराठवाड्यातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा प्रमाणपत्र मिळणार…  © GR copy ️  

जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी घातले 'चिंचोली' ग्रामपंचायत मध्ये लक्ष... तरी देखील वातावरण जैसे थे...

Image
  सरपंच म्हणाले घोटाळा पाठीमागील काळात... ग्रामपंचायत 'टॅक्स' थेट वयक्तिक खात्यात... चिंचोली (मोहोळ) - तालुक्यातील चिंचोली एमआयडीसी मध्ये ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात अपरातफर झाल्याची माहिती चिंचोलीच्या ग्रामपंचायत सदस्य अनिता भोसले यांनी दिलेली आहे. गावामधील अनेक कामेही बोगसरीत्या कामे न करता बीले काढले गेलेले आहेत,असा थेट आरोप चिंचोलीच्या ग्रामपंचायत सदस्य अनिता महेश भोसले यांनी केलेला आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी देखील चिंचोली ग्रामपंचायत मध्ये थेट लक्ष घातले आहे. गावच्या कारभाराविरोधात जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी देखील जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीचे पत्र देखील दिले आहे. भ्रष्टाचाराची चौकशी न झाल्यास स्थानिकांच्या वतीने आंदोलन करण्याचाही इशारा महेश भोसले यांनी दिला आहे.  जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी चिंचोली एमआयडीसीतील ग्रामपंचायत मध्ये लक्ष घातल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चिंचोली च्या हद्दीत औद्योगिक वसाहत असल्याने विविध कंपन्यांकडून बोगस पा...

संभाजी दडे ; शहाजी पवार...तालुकाध्यक्ष... मार्डी सोडून पहिल्यांदाच मोठ पद.... वाढदिवस विशेष...

Image
  उत्तर सोलापूर तालुका - नान्नज सारख्या मोठ्या खेड्यातून गावचे राजकारण करत थेट ग्रामपंचायत सदस्य ते भाजप तालुकाध्यक्ष म्हणून नाव कमविलेले संभाजी दडे यांचा आज वाढदिवस. संभाजी दडे तसे कमी बोलणारे व कायम हसत मुख असणारे व्यक्तिमत्व. तालुक्याच्या मोठ्या गावातून नेतृत्व करणे तितके सोपे नाही... त्यातही नान्नज सारख्या सुई पडली तरी राजकारण करणाऱ्या गावातून नेतृत्व उभं राहणे ही देखील मोठी कसरत आहे. उत्तर तालुक्यात भाजपला तसा चेहरा म्हणलं तर पटकन एकच नाव येत शहाजी पवार....मार्डीतून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यंत भाऊंचा प्रवास, पण उत्तर तालुक्यात कार्यकर्ता वाढविण्यात त्यांना मोठा पाठिंबा मिळाला नाही. अनेक मोक्याची पदे फक्त मार्डीत दिली जातात असा तालुक्यातील इतर गावातील लोकांचा सूर असतो. अशातच मार्डीतील तालुकाध्यक्ष सोडून संभाजी दडे यांच्या गळ्यात तालुकाध्यक्ष पदाची माळ पडली.... संभाजी दडे हे तालुकाध्यक्ष झाल्यानंतर अनेकांनी तक्रारी केल्या मुलाखती न घेता थेट निवड करण्यात आली म्हणून पण पुढे काय झाले हे सर्वांना माहित आहे. शहाजी भाऊंनी अध्यक्ष केलं असाच सर्वांचा सूर.... पण मार्डी सोडून पहिल...

'उत्तर' तालुक्यात 'बाजार' समिती निवडणूकीत ताकद दाखवलेला 'सुभाष देशमुख' गट जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या दौऱ्यावेळी मात्र लांबच...

Image
  उत्तर मध्ये बापूंच्या सायलेंट गटाला किंमत मिळेना?  गावडी दारफळ (उत्तर सोलापूर) -  उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ येथे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आले होते. कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत योजना क्र. २ मधील दारफळ (जि. सोलापूर) येथील पंपगृहाचा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला. या कामाची पाहणी करून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून योजनेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत तुळजापूरचे आमदार राणा पाटील हे उपस्थित होते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उत्तर तालुक्याच्या दौऱ्यावेळी भाजपचे शहाजी पवार उत्तर तालुकाध्यक्ष संभाजी दडे त्याचप्रमाणे शहाजी पवार यांच्या मर्जीतले कार्यकर्ते दिसून आले.   परंतु उत्तर तालुक्यात आमदार सुभाष देशमुख यांचा वेगळाच गट आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख यांचे सुपूत्र मनीष देशमुख यांच्या विजयासाठी उत्तर तालुक्यातील सगळ्याच ग्रामपंचायत मधून एकहाती मताधिक्य दिसून आले होते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उत्तर दौऱ्यात सु...

मनीष काळजेंनी आणली VIP अ‍ॅम्बेसेडर ; कारचे शौकीन म्हणून ओळख...

Image
  सोलापूर - शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे कोणत्या ना कोणत्या विषयाने नेहमी चर्चेत असतात. मनीष काळजे हे चार चाकी गाड्यांचे मोठे शौकीन आहेत. आता देखील ते चर्चेत आहेत कारण त्यांनी जुन्या जमान्यातील हिंदुस्तान अ‍ॅम्बेसेडर ही चारचाकी थेट केरळ वरुन आणली आहे.  हिंदुस्तान अ‍ॅम्बेसेडर हे भारतीय ऑटोमोटिव्ह इतिहासाचे एक प्रतिष्ठित प्रतीक आहे, जे केवळ एक वाहनच नाही तर संपूर्ण लक्झरी, सत्ता आणि जुन्या आठवणींच्या युगाचे प्रतिनिधित्व करते. अनेक दशकांपासून, ही कार देशभरातील सरकारी अधिकारी, राजकारणी आणि टॅक्सी सेवा देणाऱ्यांसाठी पसंतीची होती. मनीष काळजे यांनी अ‍ॅम्बेसेडर चारचाकी गाडी थेट केरळ वरून modify करून आणली आहे. त्यांच्या अशा हटके विषयांमुळे ते नेहमी सोलापूर शहरात चर्चेचा विषय असतात.

सरपंचालाचं गाव विसरले ; बातमी थेट ग्रामपंचायत मधून.... उत्तर सोलापूर तालुका

Image
  बोगस कारभार ; गावाकडे दुर्लक्ष ; स्वतःच केलेली ठेकेदारी... उत्तर सोलापूर तालुका - ग्रामपंचायत म्हणले की अनेकांचा पारा चढतो. तोंडातून आपसूकच अनेक शब्दांचा भडिमार होतो. गावात पाडापाडी, धराधारी, मारामारी होत राहते.       उत्तर सोलापूर तालुका तसा जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका. राजकीय दृष्ट्या अस्तित्वहीन झालेला. उत्तरमध्ये ना मोठे सरकारी कार्यालये ना मोठे सरकारी हॉस्पिटल ना कोणत्या सरकारी सुविधा.लहान सहान गोष्टीसाठी थेट सोलापूर गाठावे लागते. उत्तर तालुक्यातील आगामी काळात बहुतांश ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत.पाठीमागील तीन वर्षापूर्वी निम्या ग्रामपंचायत निवडणूका झाल्या होत्या. अनेक कुरघोड्या करून तालुक्यातील ग्रामपंचायत ताब्यात घेणारे सरपंच देखील तीन वर्षाचे झाले. सरपंच झाले ते ग्रामपंचायतकडे फिरकलेच नाहीत. गावात अंतर्गत रस्ते, ड्रेनेज पाणी रस्त्यावर, जिल्हा परिषद शाळेकडे दुर्लक्ष, गावच्या आरोग्याकडे दुर्लक्ष अशा अनेक समस्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. सरपंच आमचा निवडून आला म्हणून जे कार्यकर्ते उस्ताहात नाचले आज त्यांच्याच दारात ना रस्ता ना गटार. यामुळे वर्षभरातच ना...