संभाजी दडे ; शहाजी पवार...तालुकाध्यक्ष... मार्डी सोडून पहिल्यांदाच मोठ पद.... वाढदिवस विशेष...


 उत्तर सोलापूर तालुका - नान्नज सारख्या मोठ्या खेड्यातून गावचे राजकारण करत थेट ग्रामपंचायत सदस्य ते भाजप तालुकाध्यक्ष म्हणून नाव कमविलेले संभाजी दडे यांचा आज वाढदिवस.

संभाजी दडे तसे कमी बोलणारे व कायम हसत मुख असणारे व्यक्तिमत्व. तालुक्याच्या मोठ्या गावातून नेतृत्व करणे तितके सोपे नाही... त्यातही नान्नज सारख्या सुई पडली तरी राजकारण करणाऱ्या गावातून नेतृत्व उभं राहणे ही देखील मोठी कसरत आहे.

उत्तर तालुक्यात भाजपला तसा चेहरा म्हणलं तर पटकन एकच नाव येत शहाजी पवार....मार्डीतून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यंत भाऊंचा प्रवास, पण उत्तर तालुक्यात कार्यकर्ता वाढविण्यात त्यांना मोठा पाठिंबा मिळाला नाही.

अनेक मोक्याची पदे फक्त मार्डीत दिली जातात असा तालुक्यातील इतर गावातील लोकांचा सूर असतो. अशातच मार्डीतील तालुकाध्यक्ष सोडून संभाजी दडे यांच्या गळ्यात तालुकाध्यक्ष पदाची माळ पडली....

संभाजी दडे हे तालुकाध्यक्ष झाल्यानंतर अनेकांनी तक्रारी केल्या मुलाखती न घेता थेट निवड करण्यात आली म्हणून पण पुढे काय झाले हे सर्वांना माहित आहे.

शहाजी भाऊंनी अध्यक्ष केलं असाच सर्वांचा सूर.... पण मार्डी सोडून पहिल्यांदाच नान्नज सारख्या मोठ्या गावाला महत्वाचे पद दिले गेले हे देखील पहिल्यांदा झाले. 

उत्तर तालुक्यात नान्नज गाव मोठे असून देखील राजकारणात कधीच न पुढे आलेले. एकमेकांना ग्रामपंचायत निवडणूकित थेट अंगावर घेऊन 'काका - मालकासाठी' झटणारे गाव....

काकांनी कधी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नान्नजला दिले ना मालकांनी कधी काँग्रेस मधून एखाद्याला तालुकाध्यक्ष दिले.

मोठ्या गावाला संधी देण्याची काम शहाजी पवार यांच्याकडूनच खरे झाले.

गल्ली ते दिल्ली संपर्क असणाऱ्या शहाजी पवार यांनी संभाजी दडे यांना संधी देणे म्हणजे दडे यांच्यात काम करण्याची असलेली तत्परता..

येणाऱ्या काळात उत्तर तालुक्यात भाजप वाढी बरोबरच अंतर्गत विरोध सहन करत संभाजी दडे यांना काम करावे लागणार आहे.

शांत बसून भाजप युवा अध्यक्ष ते तालुकाध्यक्ष पदाला गवसणी घालणारे संभाजी दडे यांना भविष्यात मोठी संधी उपलब्ध होणार हे निश्चित....

Comments

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !