'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!
सोलापूर - महानगरपालिका हद्दीतील छत्रपती संभाजी नगर तलाव परिसर व किल्ला परिसर जिः सोलापूर येथील परिसर सतर्कता भाग (Alert Zone) म्हणून घोषित करणे बाबत...
ज्या अर्थी प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ मधील तरतुदीनुसार जिल्ह्यातील प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण करणे कामी आवश्यक ते अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत.
ज्या अर्थी, सोलापूर महानगरपालिका हद्दीतील छत्रपती संभाजी नगर तलाव परिसर व किल्ला परिसर जि. सोलापूर येथील कावळे, घार व बगळा पक्षी या पक्षांमध्ये अनैसर्गिक मरतूक होती, म्हणून दिनांक 10 मार्च 2025 रोजी त्याचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील High security animal disease laboratory Bhopal ला पाठविण्यात आलेले होते. सदरचे नमुने बर्ड फ्लू (H5N1) साठी होकारार्थी आलेले आहेत.
ज्या अर्थी, सोलापूर महानगरपालिका हद्दीतील छत्रपती संभाजी नगर तलाव परिसर व किल्ला परिसर जि. सोलापूर याद्वारे सदर रोगाचा प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता राकरता येत नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून प्राण्यांमधील संक्रमक व संसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 (Prevention and control of infectious and contagious diseases in animals act 2009) मधील तरतुदीनुसार सोलापूर महानगरपालिका हद्दीतील छत्रपती संभाजी नगर तलाव परिसर व किल्ला परिसर जि. सोलापूर येथे सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे.
त्या अर्थी, मी श्री कुमार आशिर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर याद्वारे प्राण्यांमधील संक्रमक व संसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 (Prevention and control of infectious and contagious diseases in animals act 2009) व Action Plan for prevention, control & containment of Avian Influenza revised 2021 मधील तरतुदीनुसार सोलापूर महानगरपालिका हद्दीतील छत्रपती संभाजी नगर तलाव परिसर व किल्ला परिसर जि. सोलापूर येथील दहा किलोमीटर त्रिज्येतील क्षेत्र सतर्क भाग (Alert Zone) म्हणून घोषित करून खालील प्रमाणे आदेश देत आहे.
सदर कार्यक्षेत्रात खालील प्रमाणे कार्यवाही करणे कामी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, सोलापूर व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांना आदेशित करीत आहे.
बाधित क्षेत्राच्या ठिकाणी नागरिकांच्या हालचालीस व इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येत आहे.
सदर शहरातील दोन्ही बाधित परिसरांची 2% सोडियम हायपोक्लोराइड किंवा पोटॅशियम परमॅग्नेट (KMnO4) निर्जंतुकीकरण करावे तसेच चुन्याची फक्की मारावी.
प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर त्रिजेतील कुक्कुट पक्षांचे सर्वेक्षण करून नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवावेत
या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सोलापूर यांची आवश्यकतेनुसार महानगरपालिका आरोग्य विभाग पोलीस विभाग महसूल विभाग ग्राम विकास विभाग वन विभाग जलसंपदा विभाग बांधकाम विभाग व परिवहन विभाग इत्यादी विभागाची आवश्यक मनुष्यबळ यंत्र व साधनसामग्री पुरवठा करावा.
पशुसंवर्धन विभाग, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, वन विभाग, जलसंपदा व परिवहन विभाग इत्यादी विभागांनी प्राण्यांमधील संक्रमक व संसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९, बर्ड ब्ल्यू रोग प्रतिबंध नियोजन व रोगप्रसार रोखणे कृती आराखडा (सुधारित) 2021 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व सात रोग नियंत्रण अधिनियम 1897 मधील तरतुदीनुसार सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील बाधित क्षेत्र येथून 0 ते 1 किलोमीटर त्रिजेच्या बाधित क्षेत्रात व । ते 10 किलोमीटर त्रिज्येच्या सर्वेक्षण क्षेत्रात कार्यवाही करावी.
पशुसंवर्धन विभागाने आजारी पक्षांचे नमुने व मृत पक्षी तात्काळ तपासणीसाठी पाठवावेत व अहवाल प्राप्त करून घ्यावा.
आवश्यक्तेनुसार मृत पक्षांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्याकरिता किमान तीन फुट खोल खड्डा करून त्यामध्ये चूना पावडर टाकून पक्षी पुरण्याची प्रक्रिया पूर्वपरवानगीने करण्यात यावी.
या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त पुरवण्यात यावा.
Comments
Post a Comment