जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी घातले 'चिंचोली' ग्रामपंचायत मध्ये लक्ष... तरी देखील वातावरण जैसे थे...

सरपंच म्हणाले घोटाळा पाठीमागील काळात... ग्रामपंचायत 'टॅक्स' थेट वयक्तिक खात्यात... चिंचोली (मोहोळ) - तालुक्यातील चिंचोली एमआयडीसी मध्ये ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात अपरातफर झाल्याची माहिती चिंचोलीच्या ग्रामपंचायत सदस्य अनिता भोसले यांनी दिलेली आहे. गावामधील अनेक कामेही बोगसरीत्या कामे न करता बीले काढले गेलेले आहेत,असा थेट आरोप चिंचोलीच्या ग्रामपंचायत सदस्य अनिता महेश भोसले यांनी केलेला आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी देखील चिंचोली ग्रामपंचायत मध्ये थेट लक्ष घातले आहे. गावच्या कारभाराविरोधात जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी देखील जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीचे पत्र देखील दिले आहे. भ्रष्टाचाराची चौकशी न झाल्यास स्थानिकांच्या वतीने आंदोलन करण्याचाही इशारा महेश भोसले यांनी दिला आहे. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी चिंचोली एमआयडीसीतील ग्रामपंचायत मध्ये लक्ष घातल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चिंचोली च्या हद्दीत औद्योगिक वसाहत असल्याने विविध कंपन्यांकडून बोगस पा...