उत्तर सोलापूर - कळमन परिसरात वाघ दिसल्याने शेतकरी व नागरिकांत भीतीची वातावरण पसरले आहे. बार्शी परिसरात दिसून आलेला वाघ हा उत्तर तालुक्यातील कळमन रस्त्याजवळ दिसून आला. यवतमाळ मधून आलेला वाघ हा ६०० किलोमीटर प्रवास करून सोलापूर मध्ये आल्याचे सांगण्यात आले. आज संध्याकाळी सागर गंदोरे यांच्या शेताजवळ कळमण रोड जवळ वाघ पाहण्यात आला आहे. याचा हा लाईव्ह फोटो आहे तरी सर्व कळमन व दारफळ येथील ग्रामस्थांनी व शेतकरी बांधवांनी खबरदारी घ्यावी ही नम्र विनंती तालुका पोलीस स्टेशन व वन विभागाला कळवण्यात आले आहे तरी सर्वांनी काळजी घ्यावी. रात्री १२ वाचुन १५ मिंटानी गावडी दारफळ - कळमण रस्त्यावर सागर गंदुरे याच्या शेता जवळ राहुल घोलप व विराज घोलप यांना वाघ आढळुन आलेचे त्यांनी सांगितले आहे. वनविभागाने त्या वाघाबद्दल अधिक माहिती खलील विडिओ द्वारे प्रसारित केली होती
सोलापूर - महानगरपालिका हद्दीतील छत्रपती संभाजी नगर तलाव परिसर व किल्ला परिसर जिः सोलापूर येथील परिसर सतर्कता भाग (Alert Zone) म्हणून घोषित करणे बाबत... ज्या अर्थी प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ मधील तरतुदीनुसार जिल्ह्यातील प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण करणे कामी आवश्यक ते अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. ज्या अर्थी, सोलापूर महानगरपालिका हद्दीतील छत्रपती संभाजी नगर तलाव परिसर व किल्ला परिसर जि. सोलापूर येथील कावळे, घार व बगळा पक्षी या पक्षांमध्ये अनैसर्गिक मरतूक होती, म्हणून दिनांक 10 मार्च 2025 रोजी त्याचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील High security animal disease laboratory Bhopal ला पाठविण्यात आलेले होते. सदरचे नमुने बर्ड फ्लू (H5N1) साठी होकारार्थी आलेले आहेत. ज्या अर्थी, सोलापूर महानगरपालिका हद्दीतील छत्रपती संभाजी नगर तलाव परिसर व किल्ला परिसर जि. सोलापूर याद्वारे सदर रोगाचा प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता राकरता येत नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून प्राण्यांमधील संक्रमक ...
मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय ! सावळेश्वर(मोहोळ) - शेतकरी, महिला,विद्यार्थी व कष्टकरी लोकांना न्याय मिळण्याचे ठिकाण म्हणजे सावळेश्वर मंडळ अधिकारी कार्यालय. सरकारी कार्यालयात जायचे म्हटले की सामान्य माणूस डोक्याला हात लावतो.सरकारी कार्यालयात पैसे खर्च करून वरून हेलपाटे मारून सामान्य नागरिक हैराण होतो. सरकारी कार्यालय म्हटलं की तोंड वाकडं होत. परंतु मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर मंडल अधिकारी कार्यालय हे याला अपवाद ठरत आहे. वृद्ध महिला, निराधार महिला, विद्यार्थी, शेतकरी यांच्या एका दिवसात अडचणी सोडविण्याचे काम या भागात होत आहे. आलेली प्रकरणे थेट मार्गी लागत आहेत. यामुळे या भागातील नागरिक समाधानी असल्याचे सांगितले जाते. सावळेश्वर विभागाचे मंडल अधिकारी असलेले प्रकाश दळवी हे सामान्य लोकांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य देताना दिसून येतात.अशा प्रकारचे अधिकारी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात असले पाहिजेत असे मत सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांचा सारखा अधिकारी 'का' गरजेचा ? हे खालील घटनेवरून लक्षात येईल!! दोन वर्षांपूर्वी शिरापूर येथील एक मुस्लिम व्...
Comments
Post a Comment