भाजपातून रणजितसिंह मोहिते पाटलांची हकालपट्टी व्हावी - राम सातपुते
भाजपातून रणजितसिंह मोहिते पाटलांची हकालपट्टी व्हावी - राम सातपुते
माळशिरस मतदार संघातील पराभवामुळे राम सातपुते यांनी भाजपचे अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या कडे रणजितसिंह मोहिते पाटील यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. भाजपाचा पराभव कारण्यासाठी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सर्व उपाय योजना आखल्या असल्याचे मत राम सातपुते यांनी व्यक्त केले.
माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला.
कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला.
भाजपा कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली.
भाजपाने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली, साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले ,संपूर्ण ताकद दिली त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदिने भाजपा विरोधात काम केल. पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंट ला धमक्या दिल्या.
रणजितसिंह मोहिते पाटील यांची तात्काळ भाजपा मधून हकालपट्टी व्हावी.
Comments
Post a Comment