देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचा आनंद चंदनशिवेंनी केला सन्मान ; भरने मामांना मंत्री करण्याची केली मागणी !!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा 2024 निवडणुकी मध्ये उत्कृष्ट यश संपादन केल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी केले अभिनंदन व सत्कार
मा.अजित दादा पवार यांच्या कढे आमदार दत्तात्रय मामा भरणे यांना व मा. देवेंद्र फडणवीस यांच्या कढे आमदार विजयकुमार देशमुख यांना मंत्री मंडळामध्ये समावेश करण्याची आनंद चंदनशिवे यांनी केली मागणी.
मुंबई :-- मुंबईतील मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सागर या निवासस्थानी तसेच मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची देवगिरी निवासस्थानी सकाळी भेट घेऊन राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्याकडून विधान सभा 2024 च्या निवडणुकीत भरघोस यश संपादन केल्या बद्दल विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तसेच निळी टोपी,शाल व बुके देऊन अभिनंदन पर सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या सत्कार वेळी मा.आमदार दत्तात्रय मामा भरणे व मा. आमदार विजयकुमार देशमुख यांनी मागील कार्यकाळा मध्ये विविध विभागाच्या मंत्री पदी काम केले असुन त्यांचा अनुभव पाहता शहर व जिल्ह्यातील पक्ष वाढबरोबरच पालक मंत्री पदी असताना विकास कामा करिता भरपुर निधी उपलब्ध करून दिला.
महानगर पालिका, नगर पंचायत, पंचायत समिती, ग्राम पंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मा.अजित दादा पवार यांच्या कढे आमदार दत्तात्रय मामा भरणे यांना व मा. देवेंद्र फडणवीस यांच्या कढे आमदार विजयकुमार देशमुख यांना मंत्री मंडळामध्ये समावेश करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपअध्यक्ष तथा मा.गटनेते आनंद चंदनशिवे यांनी मागणी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे ,सोलापूर महानगरपालिका मा. नगरसेवक गणेश पुजारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव इरफान शेख , युवा नेते प्रतिक चंदनशिवे,धीरज वाघमोडे, जमीर पटेल इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment