कारंबा येथील 40 शेतकऱ्याचे मुरघास बॅग व खनिज मिश्रण खरेदीसाठी अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल...
कारंबा (उत्तर सोलापूर तालुका) - पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्यावतीने ज्या शेतकऱ्यांकडे पशुधन व दुधाळ पशुधन असणाऱ्या अशा शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मुरघास बॅग व खनिज मिश्रणासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते.
त्यासाठी कारंबा गावातील ४० शेतकऱ्यांचे प्रस्ताव उत्तर सोलापूर पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रशांत देशमुख डॉक्टर सुदेश अभिवंत डॉक्टर जाधव यांच्याकडे देण्यात आले यामुळे पशुधन व दुधाळ पशुधन असणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाल्यास त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
विश्वकर्मा सोशल फाउंडेशन कारंबा तालुका उत्तर सोलापूर यांच्यावतीने ४० शेतकऱ्याचे प्रस्ताव तयार केले. प्रस्ताव ग्रामपंचायत सदस्य विनायक सुतार यांनी दाखल केले.
Comments
Post a Comment