मौजे अकोलेकाटी गावच्या श्री यल्लम्मा देवी यात्रेस उद्या पासून प्रारंभ !
उत्तर सोलापूर - तालुक्यातील मौजे अकोलेकाटीचे ग्रामदैवत श्री यल्लम्मा देवी यात्रेस उद्याच्या पौर्णिमेपासून प्रारंभ होणार आहे.
उद्या दिनांक १५ डिसेंबर रोजी रात्री १२ नंतर परंपरे नुसार गावातील जोगुळबाई देवींची मानाची 'आरती' करून यात्रेस सुरवात होणार असल्याचे पुजारी यल्लप्पा गवळी यांनी सांगितले आहे.
अकोलेकाटीची श्री रेणुका देवी ही परिसरात जागृत देवस्थान म्हणून ओळखली जाते. हजारो भाविक हे यात्रेनिमित्त आपला 'नवस' सोडून जातात. श्री यल्लम्मा देवी यात्रेनिमित्त भाविक हे लिंब नेसून,नारळ तोरण चढवून व त्यांनी बोललेले विविध साहित्याद्वारे नवस फेडतात.यात्रेच्या पहिल्या दिवशी देवीस नैवैद्य,लिंब,नारळ अर्पण केला जातो.
दुसऱ्या दिवशी देवीची मिरवणूक काढून दुपारी तीन नंतर धार्मिक विधी करून मानकरी हे 'किच' तुडवतात.किच झाल्यानंतर यात्रा समाप्त होते. श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेची 'किच' पाहण्यासाठी उत्तर तालुक्यातील व जिल्हाभरातील भाविक येत असतात.असे देवीचे पुजारी प्रकाश बाबा लामकाने यांनी सांगितले.
Comments
Post a Comment