नवीन वर्ष नवीन आव्हाने ; उत्तर तालुक्यात काय घडामोडी...!


उत्तर सोलापूर तालुका - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि जुन्या वर्षाच्या आठवणीसाठी उत्तर तालुक्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत.उत्तर तालुका तसे पाहता इतर तालुक्यातील राजकारणापेक्षा वेगळा आहे.

तालुक्यातील लोकांचा कल हा विकासावर आहे. नवीन आव्हान स्वीकारणे आणि विकासाच्या बाजूने जाणे हेच या तालुक्याचे वैशिष्ट्य आहे.

बदलाचा स्वीकार करणे खोलात न जाता गावापासून नवीन बदल व्हावा यासाठी झटण्याची मानसिकता उत्तर तालुक्यातील नागरिकांत दिसून येते. यामुळेच उत्तर तालुक्यातील एककलमी कार्यक्रम कधीच यशस्वी होत नाही.

उत्तर तालुका हा एकूण ३६ गावांचा तालुका मिळून तालुका आहे. यातील विधानसभेसाठी मात्र विभागणी झाली आहे. २४ गावे मोहोळ विधानसभेसाठी जोडली गेली आहेत तर उर्वरित १२ गावे ही दक्षिण व शहर उत्तर विधानसभेसाठी जोडली आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीत मा आमदार यशवंत माने व नवनियुक्त आमदार राजू खरे यांच्या मोठी रस्सीखेच झाली असल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे दक्षिणला जोडलेल्या गावात एकतर्फी आमदार सुभाष देशमुख तर शहर उत्तरला जोडलेल्या गावात आमदार विजयकुमार देशमुख यांचे वर्चस्व दिसून आले.

खरा खेळ हा उत्तर तालुक्यातील २४ गावात झालेला दिसून आला. नान्नज, मार्डी, वडाळा, कळमन,बीबी दारफळ, रानमसले, अकोलेकाटी सारख्या मोठ्या गावात निवडणूक काळात मोठी चुरस पाहायला मिळाली.

अनेक गावात मोठे बदल झाले कधी नव्हे ते निर्णय निवडणूक काळात दिसून आले. आजी माजी दोनी आमदारांवर जीव लावणारी जनता दिसून आली.

तालुक्यातील बळीराम साठे,शहाजी पवार या दिग्गज नेत्यांत म्हणावी तशी चुरस दिसली नाही.वांगी गावात काकांच्या निर्णयाला अनेकांनी आव्हान दिले. पडसाळी गावात यशवंत माने यांनी केलेल्या विकास कामावर जनता भाळली नाही. राजू खरेंनी निवडणूकांपूर्वी केलेली खेळी कळमन गावात यशस्वी झाली.

कौठाळी गावात थेट लढत झाली. मार्डीतुन कधी नव्हे ते सर्वच मोठे गट एकत्र आले. नान्नज करांनी यशवंत मानेंना दिलेला शब्द पाळला.बानेगावातून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांनी अजिंक्यरणा पाटील यांच्यासाठी लीड खेचून आणला.अकोलेकाटी गावात पैशाचा खेळ साधला गेला. रानमसले गावात देखील मोठी उलट फेर झाली. 

उत्तर तालुक्यातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले गेलेले गाव म्हणजे वडाळा. तेथून देखील अनाकलनीय निकाल दिसून आला.

माजी आमदार यशवंत माने व विद्यमान आमदार राजू खरे या दोघांचा ही उत्तर तालुक्यात स्वतंत्र गट अस्तित्वात आला असला आहे. 

नव्या वर्षात या दोनी गटाची व्यूहरचना काय असेल ते कळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !