उमेश पाटलांच्या प्रेमापोटी कार्यकर्त्यांच्या हाती तुतारी !

 

उत्तर सोलापूर तालुका - मोहोळ विधानसभा निवडणूक २०२४ ही निवडणूक चांगलीच गाजली.कोणता कार्यकर्ता काय करतोय कळेपर्यंत नेत्याच्या हाती निकाल आला. काहिठिकाणी सोबत न येणारे देखील न सांगता मतदान करून गेले तर कुठे सोबत फिरून गेम करून गेले.

निष्ठावंत कुणाला म्हणावे हे नेत्यांना सांगणं अवघड झालं  अशा परिस्थितीत उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ गावचा कार्यकर्ता हा राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांच्या शब्दाला प्रमाण मानणारा ठरला.

उमेश दादा जे सांगितले तेच चिन्ह आणि तोच पक्ष! हे म्हणणं आहे बीबी दारफळच्या दिलीप ननवरेचं...

मोहोळ विधानसभा निवडणूकित कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असताना देखील दिलीप ननवरे हे पैशांच्या मागे न लागता उमेश पाटील यांच्याशी प्रामाणिक राहिले. वेळ प्रसंगी पदर पैशाने कार्यकर्त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. उमेश पाटील ज्यावेळी घड्याळचे काम करत होते त्यावेळी दिलीप ननवरेंनी घड्याळ हाती बांधले उमेश पाटील यांनी तुतारी हाती घेतली तर त्यांनी देखील उत्तर तालुक्यात गावपातळीवर अडचण असून देखील तुतारीचे काम केले.सध्य घडीला असा निष्ठावान कार्यकर्ता पाहणे नाही.

येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचे उमेश पाटील हे आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला कशाप्रकारे बळ देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !