खुशखबर! लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होण्यास सुरुवात, अनेक महिलांच्या बँक खात्यात दीड हजार जमा..!
अतिश गवळी | Updated on: Dec 27
उत्तर सोलापूर तालुका - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध भागातील महिलांच्या बँक खात्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा झाला आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
उत्तर तालुक्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. दीड हजार रुपये जमा झाल्याने तालुक्यातील महिला आनंदी झाल्याचे दिसून आले.
आज सकाळ पासूनच पैसे जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. निवडणूक कार्यकाळापासून योजने संबधी अनेक तर्क वितर्क लावले जात होते. परंतु पैसे जमा झाल्यापासून महिला वर्गात आनंद झाल्याचे दिसून आले.
Comments
Post a Comment