तीन बांगलादेशी नागरिकांना चिंचोली एमआयडीसीत पकडले


 तिघांना कोठडी : दहशतवादविरोधी पथकाची कारवाई


चिंचोली MIDC (मोहोळ) : - मोहोळ तालुक्यातील चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांत काम करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना दहशतवादविरोधी पथकाने छापा टाकून अटक केली. त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.


चंचल विष्णुदेव ऊर्फ विश्वनाथ रॉय ऊर्फ पहन (वय २९, रा. बेनिपूर, बांगलादेश), रजा हुजूरअल्ली हुसेन (३८, रा. कटला, बांगलादेश) व त्याचा तिसरा साथीदार मीनल शनीचेरा (३०, रा. फुलयोनी, बांगलादेश) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर येथील दहशतवाद‌विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सिद्धार्थ कदम व त्यांचे सहकारी चिंचोली औद्योगिक वसाहती येथे येऊन थांबले होते. त्यावेळी मोहोळ पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक अंजना फाळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी चिंचोली काटी व सावळेश्वर येथील पोलिस पाटलांना पाचारण केले व शोधमोहीम राबवली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या राहत्या खोल्यांची तपासणी केली असता त्या ठिकाणी बांगलादेशी तरुण आढळून आला. पथकाने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने माझ्याकडे पासपोर्ट नसून सोलापूर येथील एका एजंटाकडून आधार कार्ड बनवून घेतल्याचे सांगितले. त्याने दिलेल्या माहितीनुसार अन्य दोघे आढळून आले. त्या तिघांकडून पंचासमक्ष ८ हजार ५०० रुपये किमतीचे तीन मोबाइल जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या घटनेचा तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.


पासपोर्ट नव्हते, परवानगीही नव्हती


या घटनेचा पंचनामा इ-साक्ष अॅप्लिकेशन मोबाईलद्वारे करण्यात आला. या तिघांकडे भारतामध्ये येण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे नाहीत, पासपोर्ट नाही. तसेच सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांची परवानगीही नाही, असे चौकशीत आढळून आले. त्यामुळे या तिघांविरोधात मोहोळ पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागाचे पोलिस हेडकॉन्स्टेबल गोपाळ बजरंग साखरे यांनी फिर्याद दिली असून, याबाबत बोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !