रात्रीचे ०२:२९...उत्तर तालुका पोलिसांचा चोख बंदोबस्त...

 

रात्रीचे ०२:२९...उत्तर तालुका पोलिसांचा चोख बंदोबस्त...

उत्तर सोलापूर तालुका - तालुक्यात पाठीमागील काही दिवसांपासून चोरांचा सुळसुळाट झाला आहे. उत्तर तालुक्यातील नान्नज,बीबी दारफळ, कोंडी व परिसरातील गावात एकाच दिवशी दोन ते तीन चोरीच्या घटना घडल्या आहेत.

गावागावात नागरिक सतर्क असले तरी आव्हानात्मक पध्दतीने चोऱ्या होत आहेत.यामुळे तालुका पोलीस प्रशासनावर मोठा ताण आल्याचे दिसून येत आहे.


तालुक्यात रात्रभर पोलिसांची गस्त


एकीकडे शेतकरी रात्री शेताला पाणी देण्यासाठी जातो तर दुसरीकडे तालुका पोलीस हे गावच्या रक्षणासाठी रात्रभर बंदोबस्त करत आहेत.दोन्ही कडून देशसेवेचा व्रत पुर्ण क्षमतेने निभावला जात आहे.कांदा, सोयाबीन व इतर पिकांच्या उत्पादनातून आलेले पैसे शेतकरी व कष्टकरी घरात ठेवत असतात.याच पैशावर चोरटे दबा धरून आहेत.

उत्तर तालुका पोलीसांच्या वतीने गावागावात बंदोबस्त सोबतच जनजागृती देखील करण्यात येत.गावकरी साखरझोपेत असतानाच चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढत होते. यासाठीच तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत.

रात्रीचे ०२:२९...उत्तर तालुका पोलीस चोख बंदोबस्तात....


मध्यरात्री ठीक २ दोनच्या दरम्यान पोलीस उत्तर तालुक्यातील बीबी दारफळ येथे होते. गावकरी झोपेत असताना त्यांच्या संरक्षणासाठी तालुका पोलीस कर्मचारी गावात बंदोबस्त करताना दिसून येत आहेत.तालुका पोलीस कर्मचारी चमके व  ईतर कर्मचारी बंदोबस्त करताना दिसून आले.

पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या वतीने तालुक्यात रात्रीचा बंदोबस्त वाढवला आहे. पोलीस खात्यावर अगोदरच मोठा भार असतो त्यात चोरीचे प्रमाण वाढल्याने खात्यावर अतिरिक्त भार आला आहे.चोऱ्या थांबविण्यासाठी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावल्याने चोऱ्यांवर आळा बसणार आहे.

स्वतःचा जीव धोक्यात घालून तालुका पोलीस चमके व इतर कर्मचारी रात्रभर जागून तालुका फिरत आहेत. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यामुळे सुरक्षितता टिकून आहे.

Comments

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !