'शिवाजी' घोडके पाटील यांचे 'माने' परिवारात तब्बल '४२' वर्ष पूर्ण !
उत्तर सोलापूर तालुका - माने परिवाराच्या सावलीतील
४२ वर्षे...
उत्तर सोलापूर तालुक्यातील शेवटच्या,छोटाश्या भागाईवाडी गावातुन माने परिवाराच्या सावलीत आलेले शिवाजी घोडके पाटील यांनी माजी आमदार ब्रम्हदेव दादा माने व माजी आमदार दिलीपराव माने यांची माने परिवाराच्या सहवासात ४२ वर्ष पूर्ण झाली.
खेडे गावातून काहीतरी करायचे म्हणून मोठी स्वप्ने घेऊन आलेला तरुण आज माने परिवाराचा अविभाज्य भाग बनला आहे.महाराष्ट्र राज्याच्या पटलावर न गणल्या जाणाऱ्या भागाईवाडी सारख्या गावाला समृद्ध करण्याची किमया माजी आमदार दिलीपराव माने यांच्या साथीने शिवाजी घोडके पाटील यांनी केली आहे.
ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांचे काम कोणतेही असू त्यांचे निराकरण करण्याची क्षमता ही शिवाजी घोडके पाटील यांच्याकडे आहे.
या कालावधीत कोणत्याही विद्यापिठात शिकायला मिळणार नाही एवढं शिकायला मिळाले.जिवनातील खरा आनंद मिळाला.कुटुंबाला दिशा मिळाली....स्व.दादा,आदरनिय मालक,पृथ्वीभैय्या,व माने परिवाराचे हे अनंत उपकार आयुष्यभर जपेन.अशी भावना शिवाजी घोडके पाटील यांनी बोलून दाखवली आहे.
Comments
Post a Comment