हिवाळी अधिवेशनात जिल्हाप्रमुख मनीष काळजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें सोबत !
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष मनीष काळजेंवर!!
नागपूर - हिवाळी अधिवेशना दरम्यान सोलापूरचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत नागपूर येथे दिसून आले. जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे शहर मध्य मधून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते.परंतु पक्ष आदेश आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेला प्रामाणिक पणा यामुळे मनीष काळजे यांनी निवडणूकीतून माघार घेतली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जिल्हाप्रमुख मनीष काळजेंची असलेली जवळीकता ही नागपूर अधिवेशना दरम्यान दिसून आले. जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष असते हेही यावेळी दिसून आले.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली व येणाऱ्या काळात शिवसेना पक्ष वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेणार असल्याचे मनीष काळजे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment