अमेरिकेतून ग्राहक आले चिंचोली MIDC सोलापूरात ; विमानतळ सूरु झाल्याने परदेशी गुंतवणूक वाढणार !
✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️
सोलापूरचे होटगीरोड विमानतळ सुरू झाल्या मुळे अमेरिकेतील उद्योजक व खरेदीदार विमानाने सोलापूरात येऊ लागले
🛩️🛩️🛩️🛩️🛩️🛩️🛩️🛩️🛩️🛩️
मागील 6 महिन्यापासून अमेरिकेच्या मियामी शहरातून मीस्टर अल्बर्ट व मीस्टर ब्रॅंडोन हे उद्योजक सोलापुरात येण्याचा विचार करत होते. चिंचोळी एमआयडीसीतील बंग डाटा उद्योजकांचे हे अमेरिकेतील हे ग्राहक आहेत. ते अमेरिकेहून मुंबई येथे उतरून सरळ चार्टर्ड विमानाने सोलापुरात पोहचले. दिवसभर आपले काम आटोपून परत मुंबई ला पोहचले सुद्धा.
बंग डाटा चे वासुदेव बंग यांनी सोलापूर जिल्ह्यात विमानसेवा सुरू केल्यामुळे आभार मानले व सोलापूरकरांच्या प्रयत्नां मुळेच हे शक्य झाले असे उद्गार काढले.
आता असे अनुभव कायम येत जातील व सोलापूर चा उद्योग निश्चित वाढेल.
✈️
Comments
Post a Comment