वारकरी आचारसंहिता परिषदेच्या जिल्हाप्रमुख पदी अमोल सुतार!
कारंबा (उत्तर सोलापूर) - वै मामासाहेब दांडेकर वारकरी सेवा संघ आळंदी देवाची द्वारा संचलित वारकरी आचारसंहिता परिषद ही वारकरी संप्रदायाच्या मुख्य प्रवाहात कार्य करणारे एक प्रमुख संघटन आहे
श्रीराम जन्मभुमी तीर्थक्षेत्र न्यास चे कोषाध्यक्ष आचार्य स्वामीं श्रीगोविंन्ददेव गिरीजी महाराज यांच्या आदेशानुसार ही परिषद काम करते.विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 47 हजार कैद्यांचे पालकत्व स्वीकारून कैदी सुधारणा व पुनर्वसनाच्या राष्ट्रकार्यासाठी देखिल वारकरी आचारसंहिता परिषद प्रसिद्ध आहे.
परिषदेचे मुख्य प्रवर्तक असलेले संकल्पमुर्ती ह.भ.प निलेश महाराज झरेगांवकर यांच्या नेतृत्वाखाली परिषदेचा सध्या महाराष्ट्रभर संघटनविस्तार होतो आहे.
यात पश्चिम महाराष्ट्र संघटन प्रमुख पदी.ह.भ.प.श्री संजय महाराज कोटणीस, सांगली यांची तर पश्चिम महाराष्ट्र महिला संघटन प्रमुख पदी ह.भ.प.प्रेरनाताई अंदुरे, पुणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सोलापूर जिल्हा प्रमुख पदी. श्री.अमोल सुतार तर पुणे जिल्हा प्रमुख पदी श्री.वैभव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
Comments
Post a Comment