उत्तर तालुक्यातील भ्रष्ट 'सरपंचांनो' सावधान ; 'कानून के हाथ लंबे होते हैं' !


 उत्तर तालुक्यात अनेक गंभीर प्रकरणे ; आपल्या गावात तक्रार असल्यास 'संघर्ष न्यूज मराठी'शी साधा संपर्क!

(नान्नज, बीबी दारफळ, कोंडी, पाकणी, रानमसले, कौठाळी गावे रडारवर)

कारवाई बेलाटी ग्रामपंचायतवर ; बाकी चोर घाबरले...!

बेलाटी - ग्रामपंचायतीच्या निधीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्यास प्रकरणी बेलाटी (ता. उत्तर सोलापूर) चे सरपंच शिवनेरी पाटील यांचे सरपंच व सदस्य पद रद्द करण्याचा आदेश देण्यात आला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने हे आदेश दिले असून या प्रकरणात संबंधित ग्रामसेवक व गटविकास अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटीच्या सरपंचपदी शिवनेरी पाटील यांनी ग्रामसेवकाच्या सहभागाने ग्रामपंचायत निधीमधील तब्बल दहा लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. नुकतीच या प्रकरणाची सुनावणी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासमोर पूर्ण झाली. या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी शिवनेरी पाटील यांना दोषी ठरवले असून त्यांचे सरपंचपद व सदस्यपद उर्वरित काळासाठी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवक व या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करणारे गटविकास अधिकारीही दोषी असल्याचे निरीक्षण त्यांनी आपल्या निकालात नमूद केले आहे. या प्रकरणात त्यांनी दोषींवर पुढील कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.


बेलाटी ग्रामपंचायत तिच्या कारभारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य नितीन गव्हाणे व विशाल वाघमारे यांनी २०२३ मध्ये जिल्हा परिषदेकडे केली होती. या प्रकरणात गेल्या दोन वर्षात चौकशी अहवाल सादर करण्यात आले. या चौकशी अहवालातून पाटील व तत्कालीन ग्रामसेवकांनी अपहार केल्याची बाब उघड झाली. यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !