रानमसले ग्रामपंचायत सदस्याने 'मुंडे - कराड' यांचे पोस्टर सोलापूर शहरातील मुतारीत लावले !
सोलापूर : संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे क्रौर्याची परिसीमा दाखवून देणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज धनंजय मुंडे हे आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे.
अशातच रानमसले ग्रामपंचायत सदस्य भैरवनाथ हावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धनंजय मुंडे, वाल्मीक कराड यांचे पोस्टर सोलापूर शहरातील सार्वजनिक शौचलयात लावले आहेत.
क्रूर मानसिकतेने केलेल्या हल्ल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.
ग्रामपंचायत सदस्य भैरवनाथ हावळे
Comments
Post a Comment