अविनाश मार्तंडे, प्रकाश चोरेकर : मा आ यशवंत माने यांचे शिलेदार बाजार समितीच्या रिंगणात!


 अविनाश मार्तंडे, प्रकाश चोरेकर : मा आ यशवंत माने यांचे शिलेदार बाजार समितीच्या रिंगणात : दिलीप माने यांच्याशी होणार मदत...


उत्तर सोलापूर तालुका - गेल्या विधानसभा निवडणुकीत मा आ यशवंत माने यांना उघडपणे साथ देणारे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तंडे, बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश चोरेकर यांनी बाजार समितीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

मा आ यशवंत माने यांनी देखील सोलापूर शासकीय विश्राम गृह येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत खांद्याला खांदा लावून माने सोबत उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांना यशवंत माने साथ देणार असल्याचे त्यांनी सांगतले आहे.


अविनाश मार्तंडे यांनी काका साठे यांची साथ सोडत थेट थेट अनगर गाठले होते. 

यशवंत माने यांच्या प्रेमापोटी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावून प्रकाश चोरकेर व अविनाश मार्तंडे यांनी उत्तर तालुका पिंजून काढला होता.यशवंत माने देखील प्रकाश चोरकेर व अविनाश मार्तंडे यांच्या पाठीशी राहण्याच्या सूचना अपाल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मा आ दिलीपराव माने यांच्या सोबत चर्चा करण्याचा निर्धार यशवंत माने गटाने केला आहे. दिलीप माने सोबत घेत असतील तर प्रकाश चोरकेर व अविनाश मार्तंडे यांचा मार्ग सुकर होणार आहे.

आज उद्या बाजार समितीचे सूत्र स्पष्ट होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !