उत्तर तालुक्यातील आज सकाळी '११ वा.' आरक्षण सोडत; रंगणार राजकिय समीकरण !


कुठल्या गावात कोणत आरक्षण... गावच्या पारावर चर्चा !!


उत्तर सोलापूर तालुका - उत्तर सोलापूर तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी दुपारी १२ वाजता बहुउद्देशिय सभागृह जुने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सन २०२५ ते २०३० या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मध्ये सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत तरतुदी निश्चित केल्या आहेत. सदर नियमान्वये अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, खुला व महिला (अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या स्त्रीयांसह) सरपंच पदे निश्चित करावयाची आहेत. तालुक्यातील पदाधिकारी व नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार, उत्तर सोलापूर यांनी केले आहे.


सोलापूर जिल्ह्यातील सन २०२५ ते सन २०३० या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निचित करण्यासाठी येत्या २२ एप्रिल रोजी संबंधित तालुक्यातील तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास १०२५ ग्रामपंचायतीसाठी ही आरक्षण सोडत होणार असून यामध्ये स्थानिक स्वराज संस्थामध्ये असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तथा सर्वसाधारण प्रवर्गासाठीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहिर करण्यात आली.

आहे. त्यामुळे आपल्या ग्रामपंचायतीसाठी काय आरक्षण निघणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.

सरपंच


मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणुक नियम १९६४ मध्ये सरपंच पदाच्या आरक्षणबाचत तरतुदी निश्चित केल्या आहेत. त्यातील तरतुदी आणि नियमान्वये अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग, खुला व महिला (अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व नागरीकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसह पदे निश्चित करण्यात येणार आहेत. तर या आरक्षण सोडतीसाठी त्या त्या तालुक्यातील पदाधिकारी व नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंचांनी निश्चित केलेल्या दिनांकास वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



Comments

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !