महिला तलाठी 'लाच' घेताना अँटी 'करप्शन' च्या जाळ्यात समंती देणाऱ्या 'अधिकाऱ्यावरही' गुन्हा..!


बार्शी - आरोपी लोकसेवक १) श्रीमती ऐश्वर्या धनाजी, शिरामे, पद तलाठी, (वर्ग- ३), नेमणूक सज्जा ताड सौंदणे, तहसिल कार्यालय बार्शी अंतर्गत २) श्री. रविंद्र आगतराव भड, पद महसुल सहाय्यक, (वर्ग- ३), नेमणूक तहसिल कार्यालय बार्शी यांनी तक्रारदार यांच्याकडे १७,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदरची लाच रक्कम यातील आलोसे श्रीमती ऐश्वर्या शिरामे यांनी स्वतः स्विकारल्यावरुन गुन्हा.


लाचलुचपत प्रतिबंधक विभाग


गुन्हा नोंद क्रमांक


कलम


आरोपीचे नांव व कार्यालय


सोलापूर युनिट, पुणे परिक्षेत्र,


बार्शी शहर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.


भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७, ७ अ, १२ प्रमाणे,


११) श्रीमती ऐश्वर्या धनाजी, शिरामे, पद तलाठी, (वर्ग- ३), नेमणूक सज्जा ताड सौंदणे, तहसिल कार्यालय बार्शी अंतर्गत रा. अंबीका गृहनिर्माण सोसायटी, परांडा रोड, बारंगुळे प्लॉट, बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर.


मागणी केलेली लाचेची रक्कम


२) श्री. रविंद्र आगतराव भड, पद महसुल सहाय्यक, (वर्ग- ३), नेमणूक तहसिल कार्यालय बार्शी रा. अरीहंत बोपलकर हॉस्पीटल समोर, देवकर प्लॉट बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर,


सुरवातीला तक्रारदार यांचेकडे २०,०००/- रुपये लाचेची मागणी करून पडताळणी दरम्यान


१७,०००/- रू लाचेची मागणी केली आहे.


स्विकारलेली लाचेची रक्कम


थोडक्यात माहिती


१७,०००/- रुपये.


पडताळणी कारवाई दि. २५.०२.२०२५ रोजी.


सापळा कारवाई दि. २६/०२/२०२५, दि. २७/०२/२०२५ व दि. १८/०३/२०२५ रोजी.


यशस्वी सापळा कारवाई दि. ०३/०४/२०२५ रोजी.


यातील तक्रारदार यांनी त्यांचे पत्नीचे नावे आलेल्या शेतजमीनीचा महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये वाटप पत्र होवून त्यांचे मुलाचे नावे होणेकरीता तलाठी कार्यालय ताड सौंदणे यांचेकडे दि. ०५/०२/२०२५ रोजी अर्ज सादर केला होता. सदर अर्जाचे अनुषंगाने यातील तक्रारदार पाठपुरवा करत असताना यातील लोकसेवक श्रीमती ऐश्वर्या शिरामे, पद तलाठी यांनी सादर केलेल्या आर्जावरुन महसुल अधिनीयम १९६६ चे कलम ८५ अन्वये प्रस्ताव तयार करुन तो तहसिलदार बार्शी यांचेकडून मंजुर करुन त्याबाबतचे आदेश काढणेकरीता स्वतःकरीता तसेच इतरांनकरीता असे म्हणून १७,०००/- रुपये लाचेची मागणी करुन ती स्वतः स्वीकारली आहे. तसेच यातील लोकसेवक रविंद्र भड, पद महसूल सहाय्यक, तहसिल कार्यालय बार्शी यांनी श्रीमती ऎश्वर्या शिरामे यांचे लाच मागणीस संमती तसेच प्रोत्साहन देवून बेकायदेशीर वर्तन केले आहे म्हणून यातील लोकसेवक १) श्रीमती ऐश्वर्या शिरामे, पद तलाठी २) श्री. रविंद्र भड, पद महसुल सहाय्यक यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.


मार्गदर्शन अधिकारी


श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि., पुणे.


डॉ. शीतल जानवे/खराडे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.. पुणे.


श्री. विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., पुणे.


पर्यवेक्षण अधिकारी


सापळा पथक


श्री. गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक, एसीबी सोलापूर.


सदरची कारवाई उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक, एसीबी, सोलापूर,


पोलीस अंमलदार पोहेकॉ अतुल घाडगे, पोहेकों/ सलिम मुल्ला, पोना / स्वामीराव जाधव, मपोकों/ प्रियंका गायकवाड, चापोह/राहुल गायकवाड, चापोशि/शाम सुरवसे सर्व नेम. ला.प्र.वि., सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्हयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारा संबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !