उत्तर मधील जिल्हाप्रमुख मनीष 'काळजेंच्या' कार्यकर्त्यांनी केले मनीष 'देशमुख' यांचे अभिनंदन!



मनीष देशमुख यांची पहिलीच थेट निवडणूक विजयाने संपन्न...

 सोलापूर - नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडूण आल्या बद्दल नूतन संचालक मनीष देशमुख यांचे उत्तर सोलापूर तालुका युवासेनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या माध्यमातून उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे अकोलेकाटी, नान्नज, बीबी दारफळ, रानमसले, कळमण व तालुक्यांतील इतर गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी नूतन संचालक मनीष देशमुख यांना विजयी केले.अटीतटीच्या सामन्यात मनीष देशमुख यांनी विक्रमी मतांनी विजय संपादन केला.
आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलसाठी उत्तर तालुक्यांतील युवासेना ताकतीने उभी असल्याचे तालुकाप्रमुख अतिश गवळी यांनी सांगीतले.
नूतन संचालक मनीष देशमुख यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडून आल्याबद्दल युवासेना तालुकाप्रमुख अतिश गवळी यांनी सोलापूर विश्राम गृह येथे भेटून अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !