सोलापूर जिल्हा नियोजन समिती : 'डीपीसी'तील कामांना 'मेमध्येच' मान्यता


DPC Fund : जिल्हा वार्षिक योजना सन २०२५ - २६


सोलापूर - अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला ९३४ कोटी २८ लाखांचा निधी मंजूर आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी एका महिन्याच्या काळात मंजूर निधी अंतर्गत सर्व कामांच्या याद्या जिल्हा नियोजन समितीला सादर कराव्यात.


Solapur News: जिल्हा वार्षिक योजना सन २०२५- २६ अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला ९३४ कोटी २८ लाखांचा निधी मंजूर आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी एका महिन्याच्या काळात मंजूर निधी अंतर्गत सर्व कामांच्या याद्या जिल्हा नियोजन समितीला सादर कराव्यात. वेळेत निधी खर्च होण्यासाठी आणि कामांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आता मेमध्येच कामांना अंतिम मान्यता देणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.


नियोजन समिती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार राजू खरे, प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलिस शहर पोलीस शहर उपायुक्त दीपाली काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख दादासाहेब घोडके, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी दयासागर दामा यांच्या सह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


जिल्हा वार्षिक योजना सन २०२४- २०२५ सर्वसाधारण अंतर्गत सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाला  अकरा वाहने मिळाली आहेत. त्या वाहनांना पोली.. आयुक्त कार्यालयात हिरवा झेंडा दाखवून पालकमंत्री जयकमार गोरे यांनी लोकार्पण केले. महसूल विभागाला जिल्हा वार्षिक योजना सन २०२४- २०२५ सर्वसाधारण अंतर्गत सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाला अकरा वाहने मिळाली आहेत. त्या वाहनांना पोलीस आयुक्त कार्यालयात हिरवा झेंडा दाखवून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लोकार्पण केले. महसूल विभागाला मिळालेल्या वाहनांचेही लोकार्पणही नियोजन समिती परिसरात झाले.

Comments

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !