आज उपमुख्यमंत्री 'एकनाथ शिंदे' यांचा सोलापूर दौरा; शिवसेनेसाठी हा दौरा म्हणजे भर उन्हाळ्यात गारवा !
लाडके जिल्हाप्रमुख 'मनीष' काळजे असणार सोबत...
सोलापूर :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी सोलापूर शासकीय विमानतळावर आगमन होणार आहे. मुख्यमंत्री असताना सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा रुबाब हा शासन दरबारी चांगलाच होता.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे एकनाथ शिंदे यांचे लाडके जिल्हाप्रमुख म्हणून ओळखले जातात. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा हा शिवसेनेसाठी विशेष आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शासकीय विमानाने यांचे आगमन झाल्यानंतर ते लगेच हेलिकॉप्टरने थेट सांगोला येथे जाणार आहेत.
Comments
Post a Comment