सुभाष बापूंना 'घेरण्याचा' कल्याणशेट्टींचा डाव ; बाजार समितीच्या 'किंग' पदी 'दिलीप' मानेंना संधी?
सत्ता भाजपाची ; पण किंग कल्याणशेट्टी ; बापूंचा शांत संयमपणा त्यांनाच नडणार का?
सोलापूर - महाराष्ट्रात गाजलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचेच दोन पॅनल आमने सामने भिडले होते. भाजपचे अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि दक्षिण विधानसभेचे आमदार सुभाष देशमुख या दोघांत शित युद्ध पहायला मिळाले.
ग्रामपंचायत विभागातून सुभाष देशमुख गटाने चांगलीच बाजी मारली तर दुसरी सचिन कल्याणशेट्टी यांच्या गटाने सहकारातील किंग दिलीप माने यांच्या सोबतीने सोसायटी गटातून सुभाष देशमुख गटाचा सुफडा साफ केला.
माजी आमदार दिलीप माने यांनी आणखी एकदा दाखवून दिले की सहकारात आमचेच नाणे चालते. जसे बोलले तसे दाखवून दिले आम्ही सहकारात समर्थ आहोत हे.
तर दुसरी कडे सुभाष बापूंनी ग्रामपंचायत गटात तीन शिलेदार निवडून आणून दाखवून दिले की बाजार समितीत पुढील निर्णय घेण्यासाठी सामना आमचा देखील करावा लागेल.
पण सहकारातील आम्ही समर्थ मनणाऱ्या दिलीप मानेंना देखील स्वतः चे अस्तित्व विसरून भाजपच्या सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत वेळी वेळी प्रसार माध्यमांना सांगावे लागले.
येणाऱ्या काळात बापू - दादा ची जोडी देखील एकत्र येऊ शकते? हेही दिलीप माने चांगलेच जाणून आहेत.
Comments
Post a Comment