'काँग्रेसचे' दिलीप 'माने' भाजपच्या गोटात ? काय म्हणाले 'मुख्यमंत्री' फडणवीस!
मुख्यमंत्री निवासस्थान 'वर्षा बंगला मुंबई
मुंबई - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन संचालक मंडळींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगला या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी नुकत्याच झालेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी , माजी आमदार दिलीप माने व सुरेश हसापुरे यांचा गटाचे 18 पैकी 15 सर्वाधिक जागा जिंकून विजय मिळवल्याबद्दल मा. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या !
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे,आमदार श्री.सचिन कल्याणशेट्टी , आमदार श्री देवेंद्रजी कोठे, मा.आमदार श्री. दिलीपजी माने, बाजार समितीचे नूतन संचालक श्री. सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे उपस्थित होते.
Comments
Post a Comment