उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप यावेळी येणार कार्यक्रमस्थळी.....
अक्कलकोट - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अक्कलकोट दौऱ्यावर येणार होते. दुपारी दोन वाजता असणारा दौरा संध्याकाळचे सात वाजले तरी आणखी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अक्कलकोट येथे आले नाहीत.
माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांचा मोठा पक्ष प्रवेश सोहळा अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आला आहे. दुपारी सुरु होणारा कार्यक्रम संध्याकाळचे सात वाजले तरी आणखी सुरू नाही. यामुळे कार्यकर्ते पुरते वैतागले आहेत.
सकाळी पासून बसलेला कार्यकर्ता घरी निघण्याच्या मार्गावर आहे.
अशातच सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला आहे.संध्याकाळचे बारा वाजूदे शिंदे साहेब अक्कलकोटला म्हेत्रे यांच्या पक्ष प्रवेशासाठी येणार आहेत असे ते बोलताना म्हणाले आहेत.
Comments
Post a Comment