मोहोळचे आमदार राजू खरे शिवसेनेच्या मंचावर ; राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी 'धनुष्यबाणा'सोबत !
अक्कलकोट - विधानसभेचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पक्ष प्रवेशा निमित्त अक्कलकोट येथे शिवसेनेचा पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रम होत आहे. या निमित्ताने मोहोळ विधानसभेचे आमदार राजीव खरे हे अक्कलकोट येथे शिवसेनेच्या स्टेजवर दिसले.
मोहोळ विधानसभेचे विद्यमान आमदार राजू खरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या तुतारी या चिन्हावरून निवडून आले आहेत.परंतु आमदार राजू खरे तन-मन-धनाने नेहमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच बाजूने दिसून आले आहेत.
आजही अक्कलकोट येथील शिवसेनेच्या मंचावर राजू खरे हे बिन दिक्कतपणे बसले असल्याचे दिसून आले.
आमदार राजू खरे हे जरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असले तरी त्यांचा कल हा नेहमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडेच राहिला आहे.
Comments
Post a Comment