१४ जुलै पर्यंत मतदार याद्या ; 'उत्तर' मधे एक 'zp' गट वाढ ; तुंबलेले पुढारी येणारं मैदानात...

सप्टेंबर मध्ये लागणार 'ZP - पंचायत' समितीचे इलेक्शन...?


सोलापूर - गावा गावात तालुक्यातील पुढाऱ्यांची गाडी दिसणार. मीच कसा योग्य उमेदवार दाखवण्याची धडपड दिसणार. पाहुणे रावळे गाठी भेटी वाढणार.ग्रामपंचायत निवडणुकीत तोंडावर पडलेले पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी करतांना दिसून येतील.

कारण 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 32 जिल्हा परिषदांचे गट आणि 336 पंचायत समितीच्या गणांची प्रभाग रचना करण्याचा आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने शुक्रवारी काढला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या 68 ही कायम राहिली असून मोहिते पाटील यांच्या माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेचे दोन गट आणि पंचायत समितीचे चार गण कमी झाले आहेत. ती घटलेली संख्या उत्तर सोलापूर आणि करमाळा तालुक्यात वाढली असून दोन्ही तालुक्यात जिल्हा परिषदेचे प्रत्येक एक गट आणि पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत.


प्रभाग रचनेसाठी समिती


जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची प्रभाग रचना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी, संबंधित तहसीलदार, संगणक तज्ज्ञ आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.


हरकती अन् सुनावणी


प्रभाग रचनेवर जिल्हाधिकारी आणि संबंधित तहसीलदारांच्या कार्यालयात हरकती घेता येणार आहेत. प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या हरकतींवर विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे, त्यानंतर जिल्हाधिकारी हे गट आणि गणाचे अंतिम प्रभाग जाहीर करणार आहेत.


जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभागांची प्रारूप यादी 14 जुलैपर्यंत प्रसिद्ध होणार आहे, त्यानंतर 21 जुलैपर्यंत हरकती आणि सूचना मागविल्या जाणार आहेत. विभागीय आयुक्तांकडे 11 ऑगस्टपर्यंत सुनावणी होणार असून अंतिम मान्यतेसाठी प्रभाग रचना 18 ऑगस्टपर्यंत सादर केली जाणार आहे.


झेडपी सदस्यांची तुलनात्मक संख्या





!!!! मौजे अकोलेकातीत होणारं विकास कामांचा भव्य शुभारंभ !!!!



Comments

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !