'संतोष पवार - उमेश पाटील' जोडीला लागली नजर... कुरघोडीचे राजकारण झाले सुरू....
'उमेश पाटील - संतोष पवार' यांच्या जोडीने सोलापूर शहर जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजकारण केले.... आता तीच जोडी झाली वेगळी....
सोलापूर - सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी अजित पवार गटात गटबाजीने रान उठवले आहे. सत्तेत राहुन पक्षांतर्गत विरोध हा सगळ्याच पक्षात सुरू आहे.
कधी काळी सख्या भावा प्रमाणे वागणारी संतोष-उमेश यांची जोडी वेगळी झाल्याची दिसुन येत आहे.
अनगरकरांची गाडी डॉ बाबासाहेब आंबेडकर,पार्क चौकात थांबल्याने राष्ट्रवादीत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या कार्यालयात माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, बाळराजे पाटील यांनी भेट दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना विरोध मानला जात आहे.
उमेश पाटील यांचे सोलापूर शहरात वाढते लक्ष शहरातील परस्पर निर्णय यामुळे सध्याचे बदल होत असल्याचे दिसून येत आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत यावेळी देखील शहराच्या राष्ट्रवादीत बदल करण्यात येणार आहेत अशी चर्चा सध्या सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरू आहे.
माजी आमदार यशवंत माने हे वरवरून शांत दिसत असले तरी अंतर्गत अनेक मोठ्या घडामोडी घडवून आणण्यात ते पटाईत आहेत.
Comments
Post a Comment