गरिब होतकरू विद्यार्थ्यांचा आधार होतेय विश्व निसर्ग मानव संस्था - अतिश गवळी तालुकाप्रमुख युवासेना
अकोलेकाटी - छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने विश्व निसर्ग मानव संस्थेच्या वतीने शिवप्रभु मध्यामिक प्रशाला येथे शालेय साहित्य वाटप उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
सलग नऊ वर्षे यशस्वीरीत्या शाळेत कार्यक्रम करणाऱ्या संस्थेचे शाळेतील शिक्षकांनी आभार मानले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान अलाटे हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमी झटत असतात. डॉ संतोष रोडे सर यांचा आदर्श घेऊन हा कार्यक्रम राबविला जातो.
इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत विद्यार्थांना शालेय साहित्य व आर्थिक मदत करण्यासाठी संस्था नेहमी अग्रेसर असते.
सत्यवान आलाटे यांच्यामुळे गावातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना एक आशेचा किरण मिळाला असल्याचे युवासेनेचे तालुकाप्रमुख अतिश गवळी यांनी यावेळी बोलताना सांगीतले.
यावेळी शिवप्रभू प्रशालाचे सर्व शिक्षण कर्मचारी संस्थेचे सर्व पदाधिकारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन
अतिश गवळी युवासेना तालुका प्रमुख उत्तर सोलापूर,
विश्व निसर्ग मानव संस्था अकोलेकाटी संचालक मंडळ
अध्यक्ष : सत्यवान आलाटे
उपाध्यक्षा : रेशमा गवळी
सचिव : बोधराज गवळी
सहसचिव : चंद्रकांत आलाटे
खजिनदार : प्रिती आलाटे
पृथ्वीराज कोले :
प्रतिक्षा कोले :
सुधामती कांबळे
महिला बचत गटाच्या CRP महानंदा गवळी ( यशोगाथा ग्रामसंघ ) होते.
Comments
Post a Comment