Posts

Showing posts from November, 2024

अरे बापरे....काका साठेंच्या 'वडाळा' गावातूनच यशवंत मानेंना तब्बल १०३३ मते !

Image
अरे बापरे....काका साठेंच्या 'वडाळा' गावातूनच यशवंत मानेंना तब्बल १०३३ मते ! वडाळा - मोहोळ विधानसभा निवडणूक यावेळी जोरात गाजली. सर्वांना धक्का बसेल असा निकाल लागला.गावागावात ग्रामपंचायत निवडणूकी प्रमाणे वातावरण निर्मिती झाली होती. पक्षाचे नेते स्वतः साठी जितके पळाले नव्हते तितके आमदारांसाठी पळाले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या साठी ही निवडणूक पूर्ण अटीतटची ठरली आहे. बळीराम साठे हे उत्तर तालुक्याचे नेतृत्व करतात.  उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ गावात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एकहाती अधिकार काका साठे यांना आहे.या विधानसभा निवडणुकीसाठी काका साठेंनी चांगलीच कंबर कसली असल्याचे दिसून आले. गावागावात वाड्यावस्त्यावर जाऊन महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांचा प्रचार काका साठेंनी केला असल्याचे पाहायला मिळाले. परंतु आपल्या होम पिचवर मात्र त्यांना म्हणाव्या तशा धावा करता आल्या नाहीत. वडाळा गावातून राजू खरेंना फक्त १८३१ मते मिळाली. तर महायुतीचे उमेदवार यशवंत माने यांना १०३३ मते मिळाली. मतदानाच्या दिवशी काका साठे वडाळा गावात तळ ठोकून उभे होते. तरी देखील ...

उत्तर तालुक्यात चोरांचा सुळसुळाट ; सतर्क राहण्याचे आवाहन - उत्तर तालुका पोलीस ठाणे

Image
उत्तर तालुका -  नान्नज,अकोलेकाटी,बीबीदारफळ व मार्डी भागात घरफोड्या, चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. त्यांच्यासोबत इतर जिल्ह्यातील आरोपी असण्याची शक्यता आहे.  नान्नज परिसरात एकाच दिवशी तीन घरफोड्या झाल्या आहेत. एका इसमाची दुचाकी चोरीला गेली आहे. 🔹विशेष करून बीबीदारफळ नान्नज वडाळा कळमन कौठाळी मार्डी भोगाव बानेगाव गावडी दारफळ होनसळ या ठिकाणी चोऱ्या घोरफोड्या होण्याची शक्यता जास्त आहे. 🔹बंद घरे टारगेट करून फोडली जात आहेत 🔹 गावात रात्री संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास त्याबाबत रात्रगस्तच्या गाडीला सूचना द्याव्यात. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान उत्तर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी केले आहे.

ब्रेकिंग - वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये देण्याबद्दल प्रशासनाने काढलेला GR रद्द

Image
 वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये देण्याबद्दल प्रशासनाने काढलेला GR रद्द भाजपा-महायुती सरकारने महाराष्ट्र वक्फ बोर्डाला तातडीने १० कोटींचा निधी दिल्याच्या खोट्या बातम्या प्रसिध्द होत आहेत. हा चुकीचा निर्णय प्रशासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी परस्पर घेतला होता. मात्र भाजप नेत्यांच्या तीव्र विरोधानंतर हा निर्णय आता रद्द करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis : मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, प्रतिज्ञा खरी ठरणार, फडणवीस 31 वे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणार!

Image
  Devendra Fadnavis : मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, प्रतिज्ञा खरी ठरणार, फडणवीस 31 वे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणार! Devendra Fadnavis Maharashtra New CM : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला आहे. भाजपने (BJP) या निवडणुकीत 132 जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. त्यातच काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी (Maharashtra CM) देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर सर्व प्रक्रिया पार पडून लवकरच औपचारिक घोषणा करण...

देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचा आनंद चंदनशिवेंनी केला सन्मान ; भरने मामांना मंत्री करण्याची केली मागणी !!

Image
  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा 2024 निवडणुकी मध्ये उत्कृष्ट यश संपादन केल्या बद्दल  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी केले अभिनंदन व सत्कार  मा.अजित दादा पवार यांच्या कढे आमदार दत्तात्रय मामा भरणे यांना व मा. देवेंद्र फडणवीस यांच्या कढे आमदार विजयकुमार देशमुख यांना मंत्री मंडळामध्ये समावेश करण्याची आनंद चंदनशिवे यांनी केली मागणी.  मुंबई :-- मुंबईतील मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सागर या निवासस्थानी तसेच मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची देवगिरी निवासस्थानी सकाळी भेट घेऊन राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्याकडून विधान सभा 2024 च्या निवडणुकीत भरघोस यश संपादन केल्या बद्दल विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तसेच निळी टोपी,शाल व बुके देऊन अभिनंदन पर सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.     या सत्कार वेळी मा.आमदार दत्तात्रय मामा भरणे व मा. आमदार विजयकुमार देशमुख यांनी मागील कार्यकाळा मध्ये विविध विभागाच्या मं...

Mahayuti : महायुतीचं खातेवाटप, कोणाकडे कोणती खाती जावू शकतात?

Image
  Mahayuti : महायुतीचं खातेवाटप, कोणाकडे कोणती खाती जावू शकतात? दिल्लीत मुख्यमंत्रिपदावरुन जसं नाव अंतिम होणार तसंच मंत्रिमंडळावरही शिक्कामोर्तब होईल. शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर आता, रस्सीखेच गृहखात्यावरुन सुरु झालीय. 2014 आणि 2022 मध्येही गृहमंत्री फडणवीसच होते. पण आता एकनाथ शिंदेंना गृहखातं हवंय, अशी माहिती आहे. Mahayuti : महायुतीचं खातेवाटप, कोणाकडे कोणती खाती जावू शकतात? मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानं गृहखातं पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेचा आहे. मात्र गृहखातं आपल्याकडेच राहावं, यासाठी भाजप आग्रही आहे. जसं गृहखातं एकनाथ शिंदेंना पाहिजे तसंच अर्थखातं अजित पवारांना हवंय. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारमध्ये अजित पवारच अर्थमंत्री होते. अर्थ खातं अजित पवारांना देण्यात भाजपची अडचण नाही. त्यामुळे सध्या रस्सीखेच भाजप आणि शिवसेनेत गृहखात्यावरुनच आहे. महाराष्ट्रात एकूण 43 मंत्री होऊ शकतात. भाजपकडे 132 आमदार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे 57 आमदार आहेत. तर राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडे 23-25 मंत्रिपदं, शिवसेनेला 9-10 आणि राष्ट...

उत्तर तालुक्यात काका साठेंचे मताधिक्य घटले !!

Image
उत्तर तालुक्यात काका साठेंचे मताधिक्य घटले !! उत्तर सोलापूर तालुका - राष्ट्रवादी शरद पवार गटाची उत्तर सोलापूर तालुक्यातील ताकत ही काका साठे हेच आहेत. वडाळा, गावडी दारफळ, कळमन,,कौठाळी,पडसाळी,वांगी व परिसरातील गावावर बळीराम साठे यांचे वर्चस्व होते. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर काका साठे यांचे वर्चस्व ढासळले असल्याचे दिसून आले. नान्नज गावातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे यशवंत माने यांना आघाडी मिळाली. या विधानसभा निवडणुकीत पैशाचा  पाऊस पडल्याची परिस्थिती होती.ग्रामपंचायत प्रमाणे विधानसभा निवडणुकीत मतदार आक्रमक दिसले. राष्ट्रवादी अजित पवार गटाला नेता नव्हता तरी देखील यशवंत माने यांच्या पाठीशी सामान्य जनता खंबीरपणे उभी असल्याचे दिसून आले. उत्तर तालुक्यात हुकमी एक्का असणारा दिलीप माने गट या विधानसभा निवडणुकीवेळी मात्र सावध दिसला. दिलीप मानेच्या निर्णया विरोधात यावेळी उत्तर तालुक्यातील मतदारांनी मतदान केल्याचे दिसून आले. बळीराम साठे यांनी या निवडणूकित पूर्ण क्षमतेने प्रचार केला. ज्याला लागेल ते पुरविले तरी देखील त्यांना म नावे असे यश मिळाले नाही.

VIP रोडवर आ विजयकुमार देशमुख व चंदनशिवेंना पाहून सचिन कल्याणशेट्टी थांबले

Image
 विजयमालक & सचिनदादा योगायोग.. भेट  उपस्थित होते आनंददादा.. सोलापूर - शहरातील VIP रोडच्या फुटपाथ वर आनंद दादा चंदनशिवे व आमदार  विजयकुमार देशमुख मालक चर्चा करत उभारला असता समोरून अक्कलकोटचे आमदार सचिन दादा हे त्यांच्या गाडीतून जात असताना त्यांची नजर दोघांकडे पडली. सचिनदादांनी गाडीतून खाली उतरून विजय मालकांचा अभिनंदन केले व निवडणुकी संदर्भात थोडी चर्चा केली सचिन दादा तिथून निघून गेले हा प्रसंग योगायोग घडला यावेळी संजय कोळी गणेश पुजारी शिवानंद पाटील बाबुराव जमादार प्रसाद कुलकर्णी चाचा सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.पुढील मंत्रिमंडळ विस्तारत कोणाला लाल दिवा मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. 

भाजपातून रणजितसिंह मोहिते पाटलांची हकालपट्टी व्हावी - राम सातपुते

Image
भाजपातून   रणजितसिंह मोहिते पाटलांची हकालपट्टी व्हावी - राम सातपुते माळशिरस मतदार संघातील पराभवामुळे राम सातपुते यांनी भाजपचे अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या कडे रणजितसिंह मोहिते पाटील यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. भाजपाचा पराभव कारण्यासाठी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सर्व उपाय योजना आखल्या असल्याचे मत राम सातपुते यांनी व्यक्त केले.  माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला.  कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला.  भाजपा कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली.  भाजपाने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली, साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले ,संपूर्ण ताकद दिली त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदिने भाजपा विरोधात काम केल. पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंट ला धमक्या दिल्या.  रणजितसिंह मोहिते पाटील यांची तात्काळ भाजपा मधून हकालपट्टी व्हावी. 

संघर्ष न्यूज मराठीच्या सर्वेत तुतारी कडून खरे पेक्षा कदम आघाडीवर!

 संघर्ष न्यूज मराठीने मोहोळ विधानसभेसाठी तुतारी गटातून कोणाची उमेदवारी योग्य याचा सर्वे घेतला होता या सर्वे मध्ये 70 लोकांनी सिद्धी रमेश कदम यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे.