अनेक हॉटेल वर थेट दारू विक्री... अनेकांचे थेट हायवेवर अतिक्रमण....
मोहोळ - एकीकडे हॉटेल व्यावसायिकांनी केलेले अतिक्रम तर दुसरीकडे त्याच हॉटेल मध्ये मिळणारे मद्य यामुळे सोलापूर पुणे हायवेवरील प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
मोहोळ तालुक्याच्या हद्दीतील सोलापूर - पुणे हायवेवरील अनेक हॉटेलमध्ये सर्रासपणे मद्य विक्री करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
रस्त्याची झालेली दुर्दशा आणि सुसाट निघालेले मद्यपी यामुळे सोलापूर - पुणे हायवे मृत्यूचा सापळा झाला आहे. हायवेवरील हॉटेल मध्ये थांबून स्थानिक नागरिकांसह अनेक लांब वाहतूक करणारे वाहन चालक देखील अशा हॉटेलात मनसोक्त दारू पितात आणि पुढील वाटचालीसाठी निघतात.
मोहोळ तालुक्यातील धाब्यावर मिळणाऱ्या अवैध मद्य विक्रीवर मोहोळ स्थानिक प्रशासन हे डोळे मिटून आहे. अनेक वर्षापासून मद्य विक्री होत असतानाही स्थानिक पोलिस प्रशासन हे हे बघ्याची भूमिका घेत आहेत.
अन्न व औषध प्रशासन हे देखील आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून अनेक हॉटेल मध्ये अस्वच्छता बरोबरच अनेक ठिकाणी किचनची स्वच्छता देखील करण्यात येत नसल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.
अनेक मोठ मोठे हॉटेल असून देखील स्वच्छतेला शून्य प्राधान्य देण्याचे काम हॉटेल व्यावसायिकांकडून होत आहे.
मोहोळ तालुक्यात अवैध मद्य विक्री करणारे व प्रशासनाची हातमिळवणी असल्याचे पाहायला मिळत आहे.
No comments:
Post a Comment