उत्तर तालुक्यातील भ्रष्ट 'सरपंचांनो' सावधान ; 'कानून के हाथ लंबे होते हैं' !

उत्तर तालुक्यात अनेक गंभीर प्रकरणे ; आपल्या गावात तक्रार असल्यास ' संघर्ष न्यूज मराठी 'शी साधा संपर्क! (नान्नज, बीबी दारफळ, कोंडी, पाकणी, रानमसले, कौठाळी गावे रडारवर) कारवाई बेलाटी ग्रामपंचायतवर ; बाकी चोर घाबरले...! बेलाटी - ग्रामपंचायतीच्या निधीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्यास प्रकरणी बेलाटी (ता. उत्तर सोलापूर) चे सरपंच शिवनेरी पाटील यांचे सरपंच व सदस्य पद रद्द करण्याचा आदेश देण्यात आला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने हे आदेश दिले असून या प्रकरणात संबंधित ग्रामसेवक व गटविकास अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटीच्या सरपंचपदी शिवनेरी पाटील यांनी ग्रामसेवकाच्या सहभागाने ग्रामपंचायत निधीमधील तब्बल दहा लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. नुकतीच या प्रकरणाची सुनावणी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासमोर पूर्ण झाली. या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी शिवनेरी पाटील यांना दोषी ठरवले असून त्यांचे सरपंचपद व सदस्यपद उर्वरित काळासाठी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणात तत्कालीन ग्र...