Posts

Showing posts from May, 2025

चिंचोळी (मोहोळ) एमआयडीसी मध्ये करंट लागून 'म्हैस' जाग्यावर दगावली; पावसाळ्यात विजेचा लोखंडी पोल धोकादायक!

Image
  चिंचोळी (मोहोळ) : विजेचा धक्का लागून म्हैस दगावण्यचा धक्कादायक प्रकार चिंचोळी (मोहोळ) एमआयडीसी मधे घडला आहे. प्राथमिक माहिती अशी की, लोखंडी पोल असल्याने त्याचा करंट पाण्यात उतरून म्हैस दगावली आहे. सतत येणाऱ्या पावसाने लोखंडी पोलचा करंट लागल्याने धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. म्हैस दगावल्याने शेतकऱ्याचे पन्नास हजारचे नुकसान झाले आहे. दुभती म्हैस दगावल्याने शेतकरी अडचणीत येणार आहे.

अक्कलकोटचे माजी आमदार सिध्दराम म्हेत्रे काँग्रेसला शेवटचा जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश करणार..?

Image
 मुंबई - अक्कलकोट विधानसभेचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. अक्कलकोटचे माजी आमदार सिध्दराम म्हेत्रे काँग्रेसला शेवटचा जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी वेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख महेश साठे उपस्थित होते.

न्यू हायस्कूल वडाळा येथे 'उद्या' होणार १० वी '१९९६-९७' च्या बॅचचा 'स्नेह' मेळावा !

Image
  वडाळा -  माजी विद्यार्थी स्नेह मेळावा 1996-97 बॅच  सोबत गुरु शिष्य या नात्याला उजाळा.. सर्वाधिक प्रामाणिक, तरल, स्वच्छ नाते म्हणजे गुरू शिष्याचे नाते. याचा श्रीगणेशा जिथे होतो, त्या शालेय जीवनातील गुरूंना व सवंगडयांना तब्बल  28  वर्षांनी भेटण्याची संधी, आमच्या मित्र-मैत्रिणींनी उपलब्ध करून दिली. 15  मे 2025  रोजी या भेटीचा योग येणार आहे. शारीरिक आकारमानात बरेच बदल झालेले हरहुन्नरी शालेय मित्रमैत्रिणी यांनाही या प्रदीर्घ कालानंतर भेटत होतो. सध्या तब्बल चाळीशीत असुनही गुरूजणांनी ‘बाळा, बछडा’ अशी प्रेमाने हाक मारून, गालावर हात फिरवत कौतुक करणार आहेत. आणि जणु आकाश ठेंगणे वाटणार आहे. निवृत्तीनंतर ज्या मातीचा स्पर्श आपण मुकलो आहोत, एकेकाळी जिथे आपण ज्ञानदानाच्या क्षेत्रात हुकुमत गाजवली त्या प्रांगणात, आपल्याला ढोल, ताश्यांच्या🥁 गजरात कोणी स्वागत करेल अशी कल्पना नसलेले शिक्षकवृंदही मनातुन आनंदी दिसणार आहेत. कार्यक्रमाची औपचारिकता सोडून दिल्यास प्रत्येकाच्या मनात एक विश्वास, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम ओतप्रोत भरले असेल. आपल्या शिक्षकांप्रती असलेला आदराचा ...

भाजप सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी....

Image
  सोलापूर - भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्षपदांची घोषणा आज करण्यात आली.  प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनीसुख संचेती यांनी या नावांची घोषणा केली.  महाराष्ट्रातील अभूतपूर्व विजयानंतर आणि लक्ष्यवेधी ठरलेल्या संघटन पर्वानंतर आता नवीन जिल्हाध्यक्ष आपले पद सांभाळणार आहेत.  नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो.

दिलीप मानेंचा सभापती पदाचा चौकार ; संघर्ष न्यूज मराठीचे अचूक अपडेट !

Image
सोलापूर -   'संघर्ष' न्यूज मराठीची 'अचूक' भविष्यवाणी ठरली खरी ; दिलीप 'मानेच' झाले सभापती ! अतिशय रंगतदार ठरलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ सचिन कल्याणशेट्टी, मा आ दिलीप माने यांच्या पॅनलने एकहाती विजय संपादन केला होता. तर दुसरी कडे आ सुभाष बापूंना ग्रामपंचायत जागेवर समाधान मानावे लागले होते. भाजपाच्या दोन गटात झालेल्या लढतीत कल्याणशेट्टी यांनी देशमुखांना खिंडीत गाठण्याची एकही संधी सोडली नाही. अशातच बाजार समितीच्या सभापती पदासाठी अनेकजण इच्छुक असले तरी दिलीप मानेच सगळी समीकरणे जुळवू शकतात हे निश्चित होते. संघर्ष न्यूज मराठी ने दोन मे रोजी दिलीप मानेचं ठरणार किंग याचा दुजोरा दिला होता.

'काँग्रेसचे' दिलीप 'माने' भाजपच्या गोटात ? काय म्हणाले 'मुख्यमंत्री' फडणवीस!

Image
  मुख्यमंत्री निवासस्थान 'वर्षा बंगला मुंबई मुंबई - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन संचालक मंडळींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगला या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी नुकत्याच झालेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी , माजी आमदार दिलीप माने व सुरेश हसापुरे यांचा गटाचे 18 पैकी 15  सर्वाधिक जागा जिंकून विजय मिळवल्याबद्दल मा. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या ! यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे,आमदार श्री.सचिन कल्याणशेट्टी , आमदार श्री देवेंद्रजी कोठे, मा.आमदार श्री. दिलीपजी माने, बाजार समितीचे नूतन संचालक श्री. सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे  उपस्थित होते.

कर्तव्य प्रिय तलाठी सोमीनाथ गवळी यांना मातृशोक ; सोजरबाई गवळी यांचे निधन !

Image
अकोलेकाटी - उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे अकोलेकाटीतील कर्तव्य प्रिय तलाठी सोमीनाथ गवळी यांच्या मातोश्री कालकथीत सोजरबाई अंबादास गवळी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्या ७२ वर्षाच्या होत्या. उत्तर सोलापूर तालुक्यातील तहसील कार्यालयातील तलाठी सोमीनाथ गवळी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा  अकोलेकाटीतील  त्यांच्या राहत्या घरापासून आज (शनिवारी) सायंकाळी नऊ वाजता निघणार आहे. 

सुभाष बापूंना 'घेरण्याचा' कल्याणशेट्टींचा डाव ; बाजार समितीच्या 'किंग' पदी 'दिलीप' मानेंना संधी?

Image
  सत्ता भाजपाची ; पण किंग कल्याणशेट्टी ; बापूंचा शांत संयमपणा त्यांनाच नडणार का? सोलापूर - महाराष्ट्रात गाजलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचेच दोन पॅनल आमने सामने भिडले होते. भाजपचे अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि दक्षिण विधानसभेचे आमदार सुभाष देशमुख या दोघांत शित युद्ध पहायला मिळाले. ग्रामपंचायत विभागातून सुभाष देशमुख गटाने चांगलीच बाजी मारली तर दुसरी सचिन कल्याणशेट्टी यांच्या गटाने सहकारातील किंग दिलीप माने यांच्या सोबतीने सोसायटी गटातून सुभाष देशमुख गटाचा सुफडा साफ केला. माजी आमदार दिलीप माने यांनी आणखी एकदा दाखवून दिले की सहकारात आमचेच नाणे चालते. जसे बोलले तसे दाखवून दिले आम्ही सहकारात समर्थ आहोत हे. तर दुसरी कडे सुभाष बापूंनी ग्रामपंचायत गटात तीन शिलेदार निवडून आणून दाखवून दिले की बाजार समितीत पुढील निर्णय घेण्यासाठी सामना आमचा देखील करावा लागेल. पण सहकारातील आम्ही समर्थ मनणाऱ्या दिलीप मानेंना देखील स्वतः चे अस्तित्व विसरून भाजपच्या सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत वेळी वेळी प्रसार माध्यमांना सांगावे लागले. ये...