वनअधिकारी 'कोरे - वनपाल दाभाडेंची' कडक कारवाई; 'माळढोक' अभयारण्य क्षेत्रात 'रसायन' सोडणारे टँकर जप्त!

माळढोक अभयारण्य क्षेत्रात रसायन सोडणाऱ्या वाहनांची जप्ती ; वनपिरक्षेत्र अधिकारी प्रदीप कोरे, वनपाल दाभाडेंची कडक कारवाई... मोहोळ - पुणे वन्यजीव विभागांतर्गत माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज वनपरिक्षेत्र हद्दीतील मौजे कुरणवाडी ता. मोहोळ येथील वनक्षेत्रात दिनांक. २८/०७/२०२५ रोजी विनविभागातील वनकर्मचारी गस्त करीत असताना सतर्कतेमुळे एक रसायनयुक्त टैंकर अभयारण्य क्षेत्रात रसायन सोडताना पकडण्यात आला. वन्यजीव विभागामार्फत गुन्हा दाखल करुन सदर टँकर (वाहन क्रमांक - MH१२.HD ५५८२) हा पाण्याचा टँकर म्हणून वापरात असल्याचा देखावा होता, मात्र त्यातून रसायनयुक्त द्रव पदार्थ अभयारण्य क्षेत्रात सोडला जात असल्याचे निदर्शनास आले . हा प्रकार वन्यप्राणी व संरक्षित पक्ष्यांच्या तसेच स्वभोवतालच्या शेतकऱ्यांना आरोग्यास गंभीर धोका पोहचवणारा आहे. सदर घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सोलापूर येथील उप प्रादेशिक अधिकारी श्री निखील मोरे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ रसायनाचे नमुने गोळा करुन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. दरम्यान सदर घटनेत टँकरचा ड्रायव्हर फरार असून त्याचा शो...