Posts

Showing posts from June, 2025

पोलीस उपायुक्त 'विजय कबाडे' यांची बदली ; थेट नागपूर...

Image
  सोलापूर - शहराचे उपायुक्त विजय कबाडे यांची बदली नागपूर शहर उप आयुक्त म्हणून झाले आहे. विजय कबाडे यांच्या कारकिर्द ही सोलापूर शहरात वादळी स्वरूपात होती.

मोहोळ; एकीकडे उमेश पाटलांचे जोरदार स्वागत... दुसरी कडे 'यशवंत माने' मतदार संघात !

Image
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची दोन्हीकडून जोरदार फिल्डींग. ...   मोहोळ - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गट 'जिल्हाध्यक्षपदी' उमेश पाटील यांची निवड झाली आहे. निवडीनंतर उमेश पाटील यांनी जोरदार भव्य असे शक्ती प्रदर्शन करून मोहोळ शहरात एंट्री घेतली.  तर दुसरीकडे मोहोळ विधानसभेचे माजी आमदार 'यशवंत माने' हे देखील विकास कामांच्या दौऱ्यानिमित्त मोहोळ मतदारसंघात फिरताना दिसून आले. मोहोळ विधानसभेचे माजी आमदार यशवंत माने हे देखील मोहोळ मतदारसंघातील शंकरगाव ते नळी या गावात रस्त्याच्या उद्घाटनासाठी आले असता लोकांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला.  'आमदार म्हणून काय कामे असतात ही तुम्ही करून दाखवली' आहेत असा तेथील लोकांनी उद्गार केला तर दुसरीकडे मोहोळ शहरात भव्य आणि दिव्य अशे उमेश पाटील यांचे स्वागत देखील दिसून आले.  आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची जोरदार तयारी सध्या दोन्हीकडून दिसून येत असले तरी अनगरकर मात्र 'वेट अँड वॉच' भूमिकेतच दिसून येत आहेत. फटाक्यांच्या आतषबाजीने मा आमदार यशवंत माने यांचे स्वागत... दुसरीकडे जिल्हाध...

शरद पवार म्हणाले 'काकांच' अंतःकरण पाहिलं तर 'शरद पवार' हे नाव दिसेल ! काका निर्णयावर ठाम....

Image
शरद पवारांची काका साठेंना भावनिक साद...   सोलापूर - सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष काका साठे यांची शरद पवार यांच्याशी भेट झाली आहे. मोहिते पाटील यांच्यामुळे आलेली कटुता सध्यातरी संपणार नाही अशीच काकांची भूमिका दिसून येत आहे. भेटी अगोदरच काका साठेंनी सांगीतले होते 'पवार साहेबांनी जरी सांगीतले तरी निर्णय बदलणार नाही...' येणाऱ्या काळात चित्र स्पष्ट होईल... तूर्तास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटतं काकांनी पवार साहेबांची साथ सोडू नये...

अजित पवार गटाचा 'मोहोळ' विधासभेचा 'आमदार' पाडणारे उमेश दादाचं जिल्ह्याचे अध्यक्ष !

Image
उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ; राजन पाटलांना धक्का ?  मोहोळ - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची नुकतीच निवड झाली आहे. या निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांनी स्वीकारले. विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेश पाटील यांनी अजित पवार गटाचे मूळ विधानसभेचे उमेदवार यशवंत माने यांचा पराभव केला होता. शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांच्या प्रचारार्थ उमेश पाटील यांनी सगळी यंत्रणा कामाला लावली होती.

🛑 ब्रेकिंग न्यूज || काका साठेंच्या हाती धनुष्यबाण ? कार्यकर्त्यांचे स्टेटसला 'उपमुख्यमंत्री' एकनाथ शिंदे !!

Image
  वडाळ्याचे काका साठे हातात घेणार धनुष्यबाण ? जिल्हाध्यक्ष पदाचा निर्णय न सांगताच..! उत्तर सोलापूर तालुका (वडाळा) - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे कालच्या झालेल्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवड करून नाराज असल्याचे दिसून आले वर्षानुवर्ष शरद पवार यांच्याशी निष्ठा ठेवून देखील त्यांना काहीही माहिती न देताच पदावरून काढण्यात आले. मोहिते पाटील समर्थक असलेले जिल्हाध्यक्ष नेमण्यात आले.  जिल्हाध्यक्ष निवडीच्या संदर्भातच बळीराम साठे यांनी वडाळा येथे तातडीची कार्यकर्त्यांची बैठक घेऊन झालेल्या घटनेच्या सविस्तर खुलासा कार्यकर्त्यांसमोर केला.  शरद निष्ठा ठेऊन रक्ताचे पाणी करणारे काका साठे यांना वेळोवळी पक्षाने अपमानित करण्याचे काम केले आहे. ज्यावेळी सगळे सोडून जात होते त्यावेळी खंबीरपणे काका साठे हे शरद पवार यांच्यासोबत उभे होते. मोहोळ चे आमदार राजू खरे यांच्याशी अर्धा तास गुप्त बैठक  काका साठे यांना कशाचीही कल्पना न देता थेट त्यांची निवड तात्पुरती प्रदेश उपाध्यक्षपदी कऱण्यात आली. वडाळा येथे मोहोळचे आमदार राजू खरे यांच्यासोबत बळीराम साठे यांनी अर्ध...

मोहोळ; 'लांबोटी' येथे एन्काऊंटर ; आरोपी पुण्याचा !

Image
 लांबोटी मध्ये पहाटेचा थरार... . मोहोळ - पोलीसांवर पिस्टलने फायर केल्याने पोलीसांनी प्रत्युरात केलेल्या चकमकीत शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला आहे.पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेने केलेल्या गोळीबारात एका कुख्यात गुन्हेगारास ठार मारण्यात आले आहे. ही घटना सोलापूर पुणे महामार्गावरील मोहोळजवळ घडली.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पुण्यातील काळेवाडी पोलीस स्टेशन परिसरात अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेला शाहरुख रहीम शेख (रा.हडपसर, पुणे ) हा सोलापूर -पुणे महामार्गावरील लांबोटी येथील नरोटे वस्ती येथे राहत असल्याची माहिती पुणे क्राईम ब्रँच यांना मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी त्यांनी रात्री घटनास्थळी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पोलिसांवर पिस्टलमधून प्रारंभी पोलीसांवर फायर केले. यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे. याबद्दल अधिकची माहिती अशी की, पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीचा सराईत गुंड आणि मोका अंतर्गत फरार असलेला आरोपी शाहरुख ऊर्फ अट्टी रहीम शेख (वय २३, रा. गल्लीनं. २३/ए, सय्यद नगर, हडपसर) याचा सोला...

१४ जुलै पर्यंत मतदार याद्या ; 'उत्तर' मधे एक 'zp' गट वाढ ; तुंबलेले पुढारी येणारं मैदानात...

Image
सप्टेंबर मध्ये लागणार 'ZP - पंचायत' समितीचे इलेक्शन...? सोलापूर - गावा  गावात तालुक्यातील पुढाऱ्यांची गाडी दिसणार. मीच कसा योग्य उमेदवार दाखवण्याची धडपड दिसणार. पाहुणे रावळे गाठी भेटी वाढणार.ग्रामपंचायत निवडणुकीत तोंडावर पडलेले पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी करतांना दिसून येतील. कारण   स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 32 जिल्हा परिषदांचे गट आणि 336 पंचायत समितीच्या गणांची प्रभाग रचना करण्याचा आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने शुक्रवारी काढला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या 68 ही कायम राहिली असून मोहिते पाटील यांच्या माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेचे दोन गट आणि पंचायत समितीचे चार गण कमी झाले आहेत. ती घटलेली संख्या उत्तर सोलापूर आणि करमाळा तालुक्यात वाढली असून दोन्ही तालुक्यात जिल्हा परिषदेचे प्रत्येक एक गट आणि पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. प्रभाग रचनेसाठी समिती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची प्रभाग रचना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी...

बीबी दारफळ करांनो सावधान... तळे भरल्यास पाण्यावर नियंत्रण नाही... काळजी घ्या...!

Image
गांधी तलाव पुर्ण भरण्याच्या मार्गावर ; अतिरिक्त पाऊस आल्यास मोठा धोका! उत्तर सोलापूर तालुका (बीबी दारफळ) -  गांधी तलाव बीबी दारफळ येथील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. मुसळधार पावसामुळे तलाव क्षमतेपेक्षा अधिक भरत जाणार आहे. याच अनुषंगाने लघु पाटबंधारे विभागाने गावाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या पत्रात पुढील उल्लेख केला आहे.. उपरोक्त विषयांस अनुसरून आपल्या अवलोकनार्थ आणण्यात येते को, या शाखा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ल.पा. तलाव बी.बी.दारफळ, ता. उत्तर सोलापूर या प्रकल्पामध्ये दि. १३/०६/२०२५ रोजी एकूण ८७.८९% इतका पाणीसाठा झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकल्पाच्या पाणलोट व मुक्त पाणलोट क्षेत्रात विशेषतः नान्नज ओढ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. असेच पाण्याचा प्रवाह सुरु राहील्यास धरण १००% झाल्यास धरणास मुक्त वहन पध्दतीचे सांडवे असून, अनियंत्रित आहेत. प्रकल्पामध्ये पूर्ण संचय पातळीपर्यंत पाणीसाठा झाल्यानंतर अतिरिक्त झालेल्या पाण्यावर नियंत्रण ठेवणे शक्य नाही. तसेच, सदर वाहून जाणारे अतिरिक्त पाण्यामुळे बी. बी. दारफळ व परिसरात असलेले स्थानिक...

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष पदी वसंत नाना देशमुख !

Image
  बळीराम साठे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती ! सोलापूर : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संघटनात्मक बदल करण्यात येत असून सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे.  पंढरपूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख यांना जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.

उद्योग मंत्री उदय सामंत उद्या सोलापूर दौऱ्यावर ; शिवसेना भवन सात रस्ता जिल्हाप्रमुख मनीष काळजे ; सभासद नोंदणी अभियान !

Image
  शिवसेना भवन सात रस्ता जिल्हाप्रमुख मनीष काळजे ; सभासद नोंदणी अभियान ! सोलापूर - राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे उद्या दिनांक 14 जून रोजी सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध भागांची बैठक सोलापूर जिल्हा नियोजन भवन येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे त्यानंतर जिल्ह्यातील उद्योजकांना येणाऱ्या अडचणी या संबंधित चर्चा या मंत्री उदय सामंत यांच्या समवेत होणार आहेत त्याचप्रमाणे शिवसेना भवन सात रस्ता येथे जिल्हाप्रमुख मनीष काळजी यांच्या कार्यालयात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या वतीने शिवसेना सभासद नोंदणी या अभियान नाची सुरुवात देखील यावेळी होणार आहे.

तीन हजारासाठी "तलाठी" अँटी करप्शनच्या जाळ्यात!

Image
  ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात अक्कलकोट : खरेदी दस्तावरून सातबाराला नोंद घेण्यासाठी पाच हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. लोकसेवक अरुण मारुती शेवाळे वय ५३ वर्षे, पद- ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) नेम- तहसिल कार्यालय, अक्कलकोट वर्ग ३ यातील तक्रारदार यांची वहिनी यांनी मौजे तळेवाड ता. अक्कलकोट जि. सोलापूर येथील गट क्रं. ५७/४/ब क्षेत्र १ हेक्टर शेतजमीन सह दुय्यम निबंधक, अक्कलकोट यांच्याकडील खरेदी दस्त क्रं. ३७१३/२०२५ दिनांक ०२/०६/२०२५ अन्वये रितसर खरेदी केली आहे. सदर खरेदी दस्तावरुन सात-बारा उता-यावर नोंद घेणेबाबत कळविले असता आलासे यांनी रु. ५०००/- लाचेची मागणी करुन रु. ३०००/-तडजोड अंती लाच रक्कम स्वतः स्विकारली आहे. यावरुन वर नमुद लोकसेवक यांचे विरुध्द अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई गणेश पिंगुवाले, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर पोलीस अंमलदार एएसआय एस. व्ही. कोळी पोना संतोष नरोटे पोकॉ गजानन किणगी व चालक पोह राहुल गायकवाड सर्व नेमणुक लाचलुचपत प्...

सोलापूर करांच्या मनात 'नसलेल्या' ठिकाणा वरून सोलापूरकरांचे स्वप्न 'भरारी' घेतयं!!

Image
  सोलापूर -  अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज सोलापूरचे स्वप्न भरारी घेत आहे. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकी पूर्वीच सोलापूरच्या डोक्यावरून विमान गिरट्या घालणार आहे. विमान सेवा झाली सुरु पण सोलापूर करांच्या मनासारखं काही घडल नाही. त्यामुळेच जेवढा हवा तेवढा उस्ताह सोलापूरकरांच्या चेहऱ्यावर सध्यातरी दिसून येत नाही. Fly91 हे प्रवासी विमान गोवा येथून सोलापूर साथी रवाना झाले आहे. त्यातील पायलट काय सूचना देत आहे पहा...

मोहोळचे आमदार राजू खरे शिवसेनेच्या मंचावर ; राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी 'धनुष्यबाणा'सोबत !

Image
  अक्कलकोट - विधानसभेचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पक्ष प्रवेशा निमित्त अक्कलकोट येथे शिवसेनेचा पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रम होत आहे. या निमित्ताने मोहोळ विधानसभेचे आमदार राजीव खरे हे अक्कलकोट येथे शिवसेनेच्या स्टेजवर दिसले. मोहोळ विधानसभेचे विद्यमान आमदार राजू खरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या तुतारी या चिन्हावरून निवडून आले आहेत.परंतु आमदार राजू खरे तन-मन-धनाने नेहमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच बाजूने दिसून आले आहेत.  आजही अक्कलकोट येथील शिवसेनेच्या मंचावर राजू खरे हे बिन दिक्कतपणे बसले असल्याचे दिसून आले. आमदार राजू खरे हे जरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असले तरी त्यांचा कल हा नेहमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडेच राहिला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप यावेळी येणार कार्यक्रमस्थळी.....

Image
  अक्कलकोट - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अक्कलकोट दौऱ्यावर येणार होते. दुपारी दोन वाजता असणारा दौरा संध्याकाळचे सात वाजले तरी आणखी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अक्कलकोट येथे आले नाहीत. माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांचा मोठा पक्ष प्रवेश सोहळा अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आला आहे. दुपारी सुरु होणारा कार्यक्रम संध्याकाळचे सात वाजले तरी आणखी सुरू नाही. यामुळे कार्यकर्ते पुरते वैतागले आहेत. सकाळी पासून बसलेला कार्यकर्ता घरी निघण्याच्या मार्गावर आहे. अशातच सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला आहे.संध्याकाळचे बारा वाजूदे शिंदे साहेब अक्कलकोटला म्हेत्रे यांच्या पक्ष प्रवेशासाठी येणार आहेत असे ते बोलताना म्हणाले आहेत.

उद्या असा असेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा!

Image
  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर - अक्कलकोट  दौरा सोलापूर दि.०४ – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवार दि. ०५ रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा अशा पद्धतीने असणार आहे. दुपारी ०२:१५ वाजता सोलापूर विमानतळ, जिल्हा सोलापूर येथे आगमन व हेलिकॉप्टरने अक्कलकोट कडे प्रयाण. अक्कलकोट दौऱ्यावेळी माजी आमदार मेत्रे यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचे प्रस्त वाढण्यासाठी मेत्रेचां पक्ष प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची धडाकेबाज कामगिरी !

Image
  सोलापूर - रेकाॅर्डवरील सराईत अंतरजिल्हा 03 गुन्हेगार जेरबंद त्यांचेकडून 04 जबरीचोरीचे व 03 वाहन चोरी व 01 आर्म अॅक्ट असे एकूण 08 गुन्हे उघडकीस 02 देशी बनावटीचे पिस्टल, 03 जिवंत काडतूसे, 58 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेसह, 02 कार, 03 मोटार सायकल, 03 मोबाईल फोन असा एकूण 12,05,600/- रू.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत सोलापूर : मा. श्री.अतुल कुलकर्णी पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी  सोलापूर ग्रामीण जिल्हयातील यांनी राश्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावरील रात्रीच्या वेळी प्रवास करणा-या लोकांना अडवून लुटमारकरून वाहने हिसकावून घेवून यासारखे प्रकारात वाढ झाल्याने, सदरचे गुन्हे उघडकीस आणून प्रतिबंध करणेकामी स्थानिक गुन्हे षाखेचे वरिश्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेष निंबाळकर यांना आदेषीत केले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे षाखा, श्री. सुरेष निंबाळकर यांनी त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून जिल्हयातील  मालाविशयीचेे गुन्हे उघडकीस आणणेकामी मार्गदर्षन करून सुचना दिल्या होत्या.  त्याप्रमाणे सपोनि नागनाथ खुणे, व त्यांचे पथक कार्यालय...