Posts

Showing posts from December, 2024

Walmik Karad:कॉलेजमध्ये शर्टच्या मागे गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावून फिरणाऱ्या वाल्मिक कराडांनी 'राखे'तून भरारी कशी घेतली?

Image
  Walmik Karad: बीडच्या वैद्यनाथ महाविद्यालयात शर्टच्या मागे गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावून फिरणारा तरुण, धनंजय मुंडेचा राईट हँड, बीडमध्ये वाल्मिक कराडचा दबदबा कसा वाढला? Walmik Karad:कॉलेजमध्ये शर्टच्या मागे गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावून फिरणाऱ्या वाल्मिक कराडांनी 'राखे'तून भरारी कशी घेतली?  Walmik Karad:कॉलेजमध्ये शर्टच्या मागे गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावून फिरणाऱ्या वाल्मिक कराडांनी 'राखे'तून भरारी कशी घेतली? Walmik Karad Source : ABPLIVE AI बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा ठपका असलेल्या वाल्मिक कराड यांनी मंगळवारी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड जवळपास 22 दिवस फरार होते. या 22 दिवसांत पोलीस यंत्रणेला त्यांचा माग काढता आला नव्हता. यापैकी काही दिवस तर वाल्मिक कराड हे पुण्यात होते. तरीही पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला वाल्मिक कराड यांचा ठावठिकाणा कळू शकला नव्हता. अखेर स्वत: वेळ आणि स्थळ ठरवून वाल्मिक कराड यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्कारली. मात्र, यानिमित्ताने बीडच्या राजकारणात 'अण्णा' म्हणून ख्यात...

नवीन वर्ष नवीन आव्हाने ; उत्तर तालुक्यात काय घडामोडी...!

Image
उत्तर सोलापूर तालुका - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि जुन्या वर्षाच्या आठवणीसाठी उत्तर तालुक्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत.उत्तर तालुका तसे पाहता इतर तालुक्यातील राजकारणापेक्षा वेगळा आहे. तालुक्यातील लोकांचा कल हा विकासावर आहे. नवीन आव्हान स्वीकारणे आणि विकासाच्या बाजूने जाणे हेच या तालुक्याचे वैशिष्ट्य आहे. बदलाचा स्वीकार करणे खोलात न जाता गावापासून नवीन बदल व्हावा यासाठी झटण्याची मानसिकता उत्तर तालुक्यातील नागरिकांत दिसून येते. यामुळेच उत्तर तालुक्यातील एककलमी कार्यक्रम कधीच यशस्वी होत नाही. उत्तर तालुका हा एकूण ३६ गावांचा तालुका मिळून तालुका आहे. यातील विधानसभेसाठी मात्र विभागणी झाली आहे. २४ गावे मोहोळ विधानसभेसाठी जोडली गेली आहेत तर उर्वरित १२ गावे ही दक्षिण व शहर उत्तर विधानसभेसाठी जोडली आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत मा आमदार यशवंत माने व नवनियुक्त आमदार राजू खरे यांच्या मोठी रस्सीखेच झाली असल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे दक्षिणला जोडलेल्या गावात एकतर्फी आमदार सुभाष देशमुख तर शहर उत्तरला जोडलेल्या गावात आमदार विजयकुमार देशमुख यांचे वर्चस्व दिसून आले. खरा खेळ हा उत्तर तालुक्यातील २...

कारंबा येथील 40 शेतकऱ्याचे मुरघास बॅग व खनिज मिश्रण खरेदीसाठी अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल...

Image
             कारंबा (उत्तर सोलापूर तालुका) -   पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्यावतीने ज्या शेतकऱ्यांकडे पशुधन व दुधाळ पशुधन  असणाऱ्या अशा शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मुरघास बॅग व खनिज मिश्रणासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते.  त्यासाठी कारंबा गावातील ४० शेतकऱ्यांचे प्रस्ताव उत्तर सोलापूर पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रशांत देशमुख डॉक्टर सुदेश अभिवंत डॉक्टर जाधव  यांच्याकडे देण्यात आले यामुळे पशुधन व दुधाळ पशुधन असणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाल्यास त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.   विश्वकर्मा सोशल फाउंडेशन कारंबा तालुका उत्तर सोलापूर यांच्यावतीने ४० शेतकऱ्याचे प्रस्ताव तयार केले. प्रस्ताव ग्रामपंचायत सदस्य विनायक सुतार यांनी दाखल केले.

तीन बांगलादेशी नागरिकांना चिंचोली एमआयडीसीत पकडले

Image
  तिघांना कोठडी : दहशतवादविरोधी पथकाची कारवाई चिंचोली MIDC (मोहोळ) : - मोहोळ तालुक्यातील चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांत काम करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना दहशतवादविरोधी पथकाने छापा टाकून अटक केली. त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. चंचल विष्णुदेव ऊर्फ विश्वनाथ रॉय ऊर्फ पहन (वय २९, रा. बेनिपूर, बांगलादेश), रजा हुजूरअल्ली हुसेन (३८, रा. कटला, बांगलादेश) व त्याचा तिसरा साथीदार मीनल शनीचेरा (३०, रा. फुलयोनी, बांगलादेश) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर येथील दहशतवाद‌विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सिद्धार्थ कदम व त्यांचे सहकारी चिंचोली औद्योगिक वसाहती येथे येऊन थांबले होते. त्यावेळी मोहोळ पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक अंजना फाळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी चिंचोली काटी व सावळेश्वर येथील पोलिस पाटलांना पाचारण केले व शोधमोहीम राबवली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या राहत्या खोल्यांची तपासणी केली असता त्या ठिकाणी बांगलादेशी तरुण आढळून आला. पथकाने...

खुशखबर! लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होण्यास सुरुवात, अनेक महिलांच्या बँक खात्यात दीड हजार जमा..!

Image
  अति श गवळी  |  Updated on:  Dec 27 उत्तर सोलापूर तालुका - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध भागातील महिलांच्या बँक खात्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा झाला आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. उत्तर तालुक्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. दीड हजार रुपये जमा झाल्याने तालुक्यातील महिला आनंदी झाल्याचे दिसून आले. आज सकाळ पासूनच पैसे जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. निवडणूक कार्यकाळापासून योजने संबधी अनेक तर्क वितर्क लावले जात होते. परंतु पैसे जमा झाल्यापासून महिला वर्गात आनंद झाल्याचे दिसून आले.

बी बी दारफळ आठवडा बाजार बंद होणार...?

Image
  बीबी दारफळ ( उत्तर सोलापूर) - तालुक्यातील परिसरात गजबजलेल्या बाजार म्हणून बीबी दारफळ गावाची ओळख आहे. गावात बाजार भरण्यासाठी सिमेंटचे कट्टे,फ्लेवर ब्लॉक (फरशी) व्यापारांसाठी मोठी सुविधा आहे. परंतु गावातील विकृत मानसिकता असलेले लोक हे त्याच बाजार कट्ट्यावर बसून खाली फरसी वर शौच्छ करत आहे. बीबी दारफळ मध्ये दर गुरुवारी सोलापूर जिल्हाभरातील व्यापारी शेव चिवडा, पाव बटर, सर्व भाजीपाला विक्री करणारे व्यापारी येत असतात. परंतु सगळी कडे घाण केल्याने त्या व्यापाऱ्यांना बाजारलगत असलेल्या घरातून खोऱ्या -पाटी घेऊन त्या संडास वरती मुरूम टाकून त्यावरती आपले दुकान मांडावे लागत आहे.  गावातील विकृत लोकांमुळे सर्व व्यापाऱ्यांनी ठरवून सांगितले आहे की पुढच्या गुरुवारी असा अस्वछ परिसर असल्यास आम्ही कोणीही येणार नाही.अगोदर चिंचोली MIDC परिसरात बाजार सुरू झाल्याने बीबी दारफळच्या बाजारावर फरक पडला आहे. त्यात असे घाण प्रकार होत राहिल्यास बाजार आणखी अडचणीत येणार आहे. यासाठी गावातील बाजारकट्ट्यावर संडास बसणाऱ्या महाशयस कोणता पुरस्कार किंवा कश्या प्रकारे सन्मान द्यायचा ते आपणच ठरवा असे गावातील सुजाण ना...

'शिवाजी' घोडके पाटील यांचे 'माने' परिवारात तब्बल '४२' वर्ष पूर्ण !

Image
  उत्तर सोलापूर तालुका - माने परिवाराच्या सावलीतील ४२ वर्षे... उत्तर सोलापूर तालुक्यातील शेवटच्या,छोटाश्या भागाईवाडी गावातुन माने परिवाराच्या सावलीत आलेले शिवाजी घोडके पाटील यांनी माजी आमदार ब्रम्हदेव दादा माने व माजी आमदार दिलीपराव माने यांची माने परिवाराच्या सहवासात ४२ वर्ष पूर्ण झाली. खेडे गावातून काहीतरी करायचे म्हणून मोठी स्वप्ने घेऊन आलेला तरुण आज माने परिवाराचा अविभाज्य भाग बनला आहे.महाराष्ट्र राज्याच्या पटलावर न गणल्या जाणाऱ्या भागाईवाडी सारख्या गावाला समृद्ध करण्याची किमया माजी आमदार दिलीपराव माने यांच्या साथीने शिवाजी घोडके पाटील यांनी केली आहे. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांचे काम कोणतेही असू त्यांचे निराकरण करण्याची क्षमता ही शिवाजी घोडके पाटील यांच्याकडे आहे.  या कालावधीत कोणत्याही विद्यापिठात शिकायला मिळणार नाही एवढं शिकायला मिळाले.जिवनातील खरा आनंद मिळाला.कुटुंबाला दिशा मिळाली....स्व.दादा,आदरनिय मालक,पृथ्वीभैय्या,व माने परिवाराचे हे अनंत उपकार आयुष्यभर जपेन.अशी भावना शिवाजी घोडके पाटील यांनी बोलून दाखवली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोंडीत निषेध आंदोलन !

Image
उत्तर सोलापूर तालुका -  बीड येथील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कोंडी गावात बुधवार दि २५/१२/२४ रोजी साय ०७:०० वा छ शिवाजी महाराज चौक कोंडी येथे निषेध करण्यासाठी हजर राहण्याचे आवाहन सोमनाथ राऊत यांनी केले आहे.

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

Image
  उत्तर सोलापूर - कळमन परिसरात वाघ दिसल्याने शेतकरी व नागरिकांत भीतीची वातावरण पसरले आहे. बार्शी परिसरात दिसून आलेला वाघ हा उत्तर तालुक्यातील कळमन  रस्त्याजवळ दिसून आला. यवतमाळ मधून आलेला वाघ हा ६०० किलोमीटर प्रवास करून सोलापूर मध्ये आल्याचे सांगण्यात आले. आज संध्याकाळी सागर गंदोरे   यांच्या शेताजवळ कळमण रोड जवळ वाघ पाहण्यात आला आहे. याचा हा लाईव्ह फोटो आहे तरी सर्व कळमन व दारफळ येथील  ग्रामस्थांनी व शेतकरी बांधवांनी खबरदारी घ्यावी ही नम्र विनंती तालुका पोलीस स्टेशन व वन विभागाला कळवण्यात आले आहे  तरी सर्वांनी काळजी घ्यावी. रात्री १२ वाचुन १५ मिंटानी गावडी दारफळ - कळमण रस्त्यावर सागर गंदुरे याच्या शेता जवळ राहुल घोलप व विराज घोलप यांना वाघ आढळुन आलेचे त्यांनी सांगितले आहे. वनविभागाने त्या वाघाबद्दल अधिक माहिती खलील विडिओ द्वारे प्रसारित केली होती

कोणत्या मंत्र्यांस कोणता बंगला!

Image
  मुंबई - निवासस्थान राम शिंदे, सभापती, विधान परिषद ज्ञानेश्वरी, राहुल नावेकर, अध्यक्ष विधानसभा शिवगिरी, चंद्रशेखर बावनकुळे रामटेक, राधाकृष्ण विखे-पाटील रॉयलस्टोन, हसन मुश्रीफ (क-८) विशाळगड,  चंद्रकांतदादा पाटील ब-१ सिहगड,  गिरीश महाजन सेवासदन, गुलाबराव पाटील जेतवन, गणेश नाईक ब-४ पावनगड ,  दादा भुसे ब-३ जंजीरा, संजय राठोड शिवनेरी, धनंजय मुंडे सातपुडा, मंगलप्रभात लोढा ब-५ विजयदुर्ग, उदय सामंत मुक्तागिरी, जयकुमार रावल चित्रकूट, पंकजा मुंडे पर्णकुटी, अतुल सावे अ-३ शिवगढ़, अशोक उईके अ-९ लोहगड, शंभूराजे देसाई मेघदूत, आशिष शेलार व-२ रत्नसिषु, दत्तात्रय भरणे ब-६ सिध्दगड, अदिती तटकरे अ-५ प्रतापगड, शिवेंद्रराजे भोसले ३-७ पन्हाळगड, माणिकराव कोकाटे अंबर-२७, जयकुमार गोरे क-६ प्रचितीगड, नरहरि झिरवाळ सुरुचि ०९, संजय सावकारे अंबर-३२, संजय शिरसाठ अंबर-३८, प्रताप सरनाईक अर्वतो-५, भरत गोगावले सुरुचि ०२, मकरंद पाटील सुरुचि-०३

उमेश पाटलांच्या प्रेमापोटी कार्यकर्त्यांच्या हाती तुतारी !

Image
  उत्तर सोलापूर तालुका - मोहोळ विधानसभा निवडणूक २०२४ ही निवडणूक चांगलीच गाजली.कोणता कार्यकर्ता काय करतोय कळेपर्यंत नेत्याच्या हाती निकाल आला. काहिठिकाणी सोबत न येणारे देखील न सांगता मतदान करून गेले तर कुठे सोबत फिरून गेम करून गेले. निष्ठावंत कुणाला म्हणावे हे नेत्यांना सांगणं अवघड झालं  अशा परिस्थितीत उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ गावचा कार्यकर्ता हा राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांच्या शब्दाला प्रमाण मानणारा ठरला. उमेश दादा जे सांगितले तेच चिन्ह आणि तोच पक्ष! हे म्हणणं आहे बीबी दारफळच्या दिलीप ननवरेचं... मोहोळ विधानसभा निवडणूकित कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असताना देखील दिलीप ननवरे हे पैशांच्या मागे न लागता उमेश पाटील यांच्याशी प्रामाणिक राहिले. वेळ प्रसंगी पदर पैशाने कार्यकर्त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. उमेश पाटील ज्यावेळी घड्याळचे काम करत होते त्यावेळी दिलीप ननवरेंनी घड्याळ हाती बांधले उमेश पाटील यांनी तुतारी हाती घेतली तर त्यांनी देखील उत्तर तालुक्यात गावपातळीवर अडचण असून देखील तुतारीचे काम केले.सध्य घडीला असा निष्ठावान कार्यकर्ता पाहणे नाही. येणाऱ्या काळात राष्ट्र...

मंत्री जयकुमार गोरे 'सोलापूर' चे नविन पालकमंत्री !

Image
                           (अतिश गवळी - मुख्य संपादक - संघर्ष न्यूज मराठी) संघर्ष न्यूज मराठीचा अंदाज १०० ℅ बरोबर ; सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरेचं!!   सोलापूर - जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असुन देखील मंत्रिमंडळामध्ये एकालाही स्थान मिळाले नाही. सलग निवडून आलेले विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे,नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे असे पाच अनुभवी आमदार असून देखील एकालाही कॅबिनेटमध्ये संधी मिळाली नाही. लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव हा भाजप पक्ष श्रेष्टींच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.यामुळेच सोलापूर मधून एकालाही संधी दिली नाही. यावेळी देखील सोलापूर जिल्ह्याला परकाच पालकमंत्री मिळणार हे निश्चित झाले आहे. सोलापूरसाठी पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील किंवा जयकुमार गोरे यांचे नावे चर्चित आहेत. मान खटावचे आमदार जयकुमार गोरे हे सोलापूरचे पालकमंत्री म्हणून जवळपास निश्चित आहेत.जयकुमार गोरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू आहेत.नवीन मंत्रिमंडळात त्यांना ग्रामविकास व...

Maharashtra Cabinet Portfolio : देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात

Image
  Maharashtra Cabinet Portfolio : अखेर महायुती सरकारमध्ये महायुती सरकारमध्ये खातेवाटप झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडेच गृह खातं ठेवलं आहे. महसूल खात्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आली आहे.  - देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, लाॅ ॲंड ज्युडीशिअरी  - एकनाथ शिंदे - नगरविकास, गृहनिर्माण  - अजित पवार - अर्थ, राज्य उत्पादन भाजपकडे असणारी खाती - देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, लाॅ ॲंड ज्युडीशिअरी  - चंद्रशेखर बावनकुळे - महसूल  - राधाकृष्ण विखे- पाटील - जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)  - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री  - गिरीश महाजन - जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण)  - गणेश नाईक - वनमंत्री  - मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास  - जयकुमार रावल - मार्केटिंग आणि प्रोटोकॉल  - पंकजा मुंडे - पर्यावरण आणि हवामान बदल, ॲनिमल हसबंडरी  - अतुल सावे - ओबीसी, डेअरी विकास आणि रिन्युएबल एनर्जी शिवसेनेचे खाते एकनाथ शिंदे - नगरविकास मंत्री व गृहनिर्माण अजित पवार - अर्थमंत्री भरत शेठ -...

फडणवीसांच्या बंगल्यावर खातेवाटप? अजित पवार आरोपांची राळ उडालेल्या धनंजय मुंडेंना स्वत:च्या गाडीतून घेऊन निघाले

Image
  Ajit Pawar & Dhananjay Munde : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत आहे. नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी (दि. 15) पार पडला. मंत्रिमंडळाच्या शपथविधीला एक आठवडा उलटला तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. एकीकडे हिवाळी अधिवेशन संपत आले असून खातेवाटप नेमके अडले कुठे? याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील रामगिरी बंगल्यावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह विधानसभा आणि विधानपरिषदेतील सर्वच आमदारांना चहापानसाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आजच खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत आहे. यावरून विरोधकांनी धनंजय मुं...

हिवाळी अधिवेशनात जिल्हाप्रमुख मनीष काळजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें सोबत !

Image
  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष मनीष काळजेंवर!! नागपूर - हिवाळी अधिवेशना दरम्यान सोलापूरचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत नागपूर येथे दिसून आले. जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे शहर मध्य मधून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते.परंतु पक्ष आदेश आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेला प्रामाणिक पणा यामुळे मनीष काळजे यांनी निवडणूकीतून माघार घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जिल्हाप्रमुख मनीष काळजेंची असलेली जवळीकता ही नागपूर अधिवेशना दरम्यान दिसून आले. जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष असते हेही यावेळी दिसून आले. सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली व येणाऱ्या काळात शिवसेना पक्ष वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेणार असल्याचे मनीष काळजे यांनी सांगितले.

पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला

Image
  हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने तलाठ्याला जबर मारहाण करण्यात आली. तर अचानक झालेल्या हल्ल्यानंतर महसूल पथकातील इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी नदीपात्रात वाट दिसेल तिकडे पळत सुटले. Jalgaon Crime:  अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या महसूल पथकावर 12 ते 15 वाळू माफियांनी अचानक हल्ला केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडली आहे. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चांदसर बु. गावातील गिरणा नदी पात्रात  घडली आहे.  हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने तलाठी दत्तात्रय पाटील यांना जबर मारहाण करण्यात आली. तर अचानक झालेल्या हल्ल्यानंतर महसूल पथकातील इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी नदीपात्रात वाट दिसेल तिकडे पळत सुटले.यावेळी तलाठी दत्तात्रय पाटील हे हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने त्यांना फावड्याने ,लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. तलाठी दत्तात्रय पाटील यांच्या पायावर फावडे मारून पायाचे हाड मोडल्याने त्यांना जळगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस न...

मौजे अकोलेकाटी गावच्या श्री यल्लम्मा देवी यात्रेस उद्या पासून प्रारंभ !

Image
  उत्तर सोलापूर - तालुक्यातील मौजे अकोलेकाटीचे ग्रामदैवत श्री यल्लम्मा देवी यात्रेस उद्याच्या पौर्णिमेपासून प्रारंभ होणार आहे. उद्या दिनांक १५ डिसेंबर रोजी रात्री १२ नंतर परंपरे नुसार गावातील जोगुळबाई देवींची मानाची 'आरती' करून यात्रेस सुरवात होणार असल्याचे पुजारी यल्लप्पा गवळी यांनी सांगितले आहे. अकोलेकाटीची श्री रेणुका देवी ही परिसरात जागृत देवस्थान म्हणून ओळखली जाते. हजारो भाविक हे यात्रेनिमित्त आपला ' नवस ' सोडून जातात. श्री यल्लम्मा देवी यात्रेनिमित्त भाविक हे लिंब नेसून,नारळ तोरण चढवून व त्यांनी बोललेले विविध साहित्याद्वारे नवस फेडतात.यात्रेच्या पहिल्या दिवशी देवीस नैवैद्य,लिंब,नारळ अर्पण केला जातो.  दुसऱ्या दिवशी देवीची मिरवणूक काढून दुपारी तीन नंतर धार्मिक विधी करून मानकरी हे ' किच ' तुडवतात.किच झाल्यानंतर यात्रा समाप्त होते. श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेची 'किच' पाहण्यासाठी उत्तर तालुक्यातील व जिल्हाभरातील भाविक येत असतात.असे देवीचे पुजारी प्रकाश बाबा लामकाने यांनी सांगितले.

उपमुख्यचे मुख्य ceo म्हणून चार्ज ; जिल्हाप्रमुख मनीष काळजेंनी केला कोहिणकर यांचा सत्कार !

Image
 सोलापूर - जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यावतीने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोहिणकर यांची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख सैफन पटेल, युवासेना तालुकाप्रमुख अतिश गवळी,बालाजी इप्पेकाल अक्षय पकाले,R K मामा, डेरेबेरे उपस्थित होते.

रात्रीचे ०२:२९...उत्तर तालुका पोलिसांचा चोख बंदोबस्त...

Image
  रात्रीचे ०२:२९...उत्तर तालुका पोलिसांचा चोख बंदोबस्त... उत्तर सोलापूर तालुका - तालुक्यात पाठीमागील काही दिवसांपासून चोरांचा सुळसुळाट झाला आहे. उत्तर तालुक्यातील नान्नज,बीबी दारफळ, कोंडी व परिसरातील गावात एकाच दिवशी दोन ते तीन चोरीच्या घटना घडल्या आहेत. गावागावात नागरिक सतर्क असले तरी आव्हानात्मक पध्दतीने चोऱ्या होत आहेत.यामुळे तालुका पोलीस प्रशासनावर मोठा ताण आल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात रात्रभर पोलिसांची गस्त एकीकडे शेतकरी रात्री शेताला पाणी देण्यासाठी जातो तर दुसरीकडे तालुका पोलीस हे गावच्या रक्षणासाठी रात्रभर बंदोबस्त करत आहेत.दोन्ही कडून देशसेवेचा व्रत पुर्ण क्षमतेने निभावला जात आहे.कांदा, सोयाबीन व इतर पिकांच्या उत्पादनातून आलेले पैसे शेतकरी व कष्टकरी घरात ठेवत असतात.याच पैशावर चोरटे दबा धरून आहेत. उत्तर तालुका पोलीसांच्या वतीने गावागावात बंदोबस्त सोबतच जनजागृती देखील करण्यात येत.गावकरी साखरझोपेत असतानाच चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढत होते. यासाठीच तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. रात्रीचे ०२:२९...उत्तर तालुका पोलीस चोख बंदोबस्तात.... मध्यरात्री ठी...

अमेरिकेतून ग्राहक आले चिंचोली MIDC सोलापूरात ; विमानतळ सूरु झाल्याने परदेशी गुंतवणूक वाढणार !

Image
  ✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️ सोलापूरचे होटगीरोड विमानतळ सुरू झाल्या मुळे अमेरिकेतील उद्योजक व खरेदीदार विमानाने सोलापूरात येऊ लागले 🛩️🛩️🛩️🛩️🛩️🛩️🛩️🛩️🛩️🛩️ मागील 6 महिन्यापासून अमेरिकेच्या मियामी शहरातून मीस्टर अल्बर्ट व मीस्टर ब्रॅंडोन हे उद्योजक सोलापुरात येण्याचा विचार करत होते. चिंचोळी एमआयडीसीतील बंग डाटा उद्योजकांचे हे अमेरिकेतील हे ग्राहक आहेत. ते अमेरिकेहून मुंबई येथे उतरून सरळ चार्टर्ड विमानाने सोलापुरात पोहचले. दिवसभर आपले काम आटोपून परत मुंबई ला पोहचले सुद्धा. बंग डाटा चे वासुदेव बंग यांनी सोलापूर जिल्ह्यात विमानसेवा सुरू केल्यामुळे आभार मानले व सोलापूरकरांच्या प्रयत्नां मुळेच हे शक्य झाले असे उद्गार काढले. आता असे अनुभव कायम येत जातील व सोलापूर चा उद्योग निश्चित वाढेल. ✈️

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !

Image
  मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय ! सावळेश्वर(मोहोळ) - शेतकरी, महिला,विद्यार्थी व कष्टकरी लोकांना न्याय मिळण्याचे ठिकाण म्हणजे सावळेश्वर मंडळ अधिकारी कार्यालय. सरकारी कार्यालयात जायचे म्हटले की सामान्य माणूस डोक्याला हात लावतो.सरकारी कार्यालयात पैसे खर्च करून वरून हेलपाटे मारून सामान्य नागरिक हैराण होतो. सरकारी कार्यालय म्हटलं की तोंड वाकडं होत. परंतु मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर मंडल अधिकारी कार्यालय हे याला अपवाद ठरत आहे. वृद्ध महिला, निराधार महिला, विद्यार्थी, शेतकरी यांच्या एका दिवसात अडचणी सोडविण्याचे काम या भागात होत आहे. आलेली प्रकरणे थेट मार्गी लागत आहेत. यामुळे या भागातील नागरिक समाधानी असल्याचे सांगितले जाते. सावळेश्वर विभागाचे मंडल अधिकारी असलेले प्रकाश दळवी हे सामान्य लोकांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य देताना दिसून येतात.अशा प्रकारचे अधिकारी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात असले पाहिजेत असे मत सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांचा सारखा अधिकारी 'का' गरजेचा ? हे खालील घटनेवरून लक्षात येईल!! दोन वर्षांपूर्वी शिरापूर येथील एक मुस्लिम व्...

अग्निवीर रोहन इनामदार यांचे मार्डीत उत्फुर्त स्वागत !

Image
    उत्तर सोलापूर (प्रतिनिधी) देशाचे रक्षण करण्यासाठी तरुणांना सक्रिय करुन त्यांना भारतीय सैन्य दलात सेवा करण्याची संधी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या अग्निवीर पदावर नियुक्ती झालेला मार्डी गावचा सुपूत्र रोहन ज्योतिराम इनामदार याचा मार्डी ग्रामस्थांच्या वतीने उत्फुर्त स्वागत करण्यात आले.    देशाच्या संरक्षणासाठी तरुणांनी सज्ज व्हावे, सैन्यात अग्निवीर म्हणून भरती व्हा,असे आवाहन  पंतप्रधानांनी केल्यानंतर श्रीक्षेत्र मार्डी येथील शेतकरी कुटुंबातील रोहन इनामदार या तरुणाने भरतीसाठी अर्ज सादर केला.सर्व‌ कसोटीत उत्तीर्ण झाल्यामुळे त्याची भरती झाली.सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करून तो शुक्रवारी (दि.६) गावी आला.भारतमातेचा सुपूत्र जन्मभुमीत येणार म्हटल्यावर त्याच्या वर्ग मित्रांनी अग्निवीर रोहनच्या स्वागताची जोरदार तयारी केली.विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे सर्व नियोजन त्याच्या मित्रांनी केले.कोणताही राजकीय हस्तक्षेप न होऊ देता रोहन इनामदार मित्र परिवाराने गावात ठिकठिकाणी त्याच्या स्वागतासाठी डिजीटल बॅनर लावले.गावाच्या प्रवेश द्वारात (पर्...